Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ठरलं ! हे असणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपाचे कमळ सलग सातव्यांदा फुलले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

ठरलं ! हे असणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपाचे कमळ सलग सातव्यांदा फुलले

Surajya Digital
Last updated: 2022/12/08 at 5:52 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● ओवेसींच्या MIM चे खातेही उघडले नाही● केजरीवालांना खातेही उघडता आले नाही

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलावरुन जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपला गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळताना दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपाचे पुन्हा कमळ फुलले आहे. Decided! This will be the new Chief Minister of Gujarat, Bhupendra Patel, the lotus flower of BJP, Narendra Modi

 

अशातच आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतची माहितीही समोर आली आहे. भाजपने याबाबतची घोषण केली आहे. गुजरातचे वर्तमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी याबाबतची घोषणा कैली आहे.10 किंवा 11 डिसेंबरला भूपेंद्र पटेल पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासह भाजपशासित राज्यातील सर्व मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

 

गुजरातमधील घाटलोडिया मतदारसंघातून भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली होती. ते 44 हजार मतांनी आघाडीवर होते. त्यांनी कॉंग्रेस उमेदवाराला पिछाडीवर टाकत विजय मिळविला आहे. गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यास भूपेंद्र पटेल राज्याचे मुख्यमंत्री राहतील, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच म्हटले होते. पटेल यांनी सप्टेंबर 2021 मध्ये विजय रुपाणी यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून पद सांभाळले. भाजप नेतृत्वाच्या या हालचालीमुळे अनेकांना धक्का बसला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे.

 

भाजप सलग सातव्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. भाजपने प्रचंड विजय मिळवला आहे. सलग सातव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

Bhupendra Patel to take oath as Gujarat CM on December 12; PM Modi, Amit Shah to attend ceremony

Read @ANI Story | https://t.co/r5FUiLytGT#GujaratElectionResult #BhupendraPatel pic.twitter.com/DNKbwsACWI

— ANI Digital (@ani_digital) December 8, 2022

घाटलोडिया विधानसभा जागा विशेष असण्याचे कारण म्हणजे 2012 आणि 2017 मध्ये आतापर्यंत दोन विधानसभा निवडणुका झाल्या आणि दोन्ही वेळा गुजरातला येथून मुख्यमंत्री मिळाले. 2012 च्या गुजरात निवडणुकीत भाजपच्या आनंदीबेन पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेशभाई पटेल यांचा १ लाख १० हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. घाटलोडिया येथे 2015 च्या पाटीदार आंदोलनानंतरही भूपेंद्र पटेल यांनी निवडणूक जिंकली. भूपेंद्र पटेल यांच्या विरोधात काँग्रेसचे अमी याज्ञिक आणि आम आदमी पक्षाचे (आप) विजय पटेल यांच्यात लढत होती. आणि यंदाही पटेल यांनी सर्वाधिक मताने विजय मिळविला आहे.

 

निवडणुकीच्या निकालानंतर आज संध्याकाळी ६.०० वाजता पंतप्रधान मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी पक्षाला मिळत असलेल्या दणदणीत विजयात आज मिठाई खाऊन आनंद साजरा केला. घटलोडिया मतदार संघ ही गुजरातची व्हीआयपी सीट आहे. याच मतदार संघात मुख्यमंत्री पटेल 1,07,960 मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. 2017 च्या निवडणुकीत भूपेंद्र पटेल यांनी या जागेवर 17 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. यंदाही भाजपाचाच चेहरा प्रभावी ठरला आहे.

 

● ओवेसींच्या MIM चे खातेही उघडले नाही

 

गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. भाजप प्रचंड बहुमताकडे वाटचाल करत आहे. दुसरीकडे, काँग्रेसचा खूपच वाईट स्थितीत पराभव होताना दिसत आहे. आप 5 जागांवर आघाडीवर आहे. ट्रेंडमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमचे खातेही उघडलेले नाही. ओवेसी यांनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता, पण त्याचा काही परिणाम दिसून आला नाही.

 

● केजरीवालांना खातेही उघडता आले नाही

 

 

हिमाचल प्रदेशात काँग्रेस सरकार स्थापन करत आहे. भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे, तर हिमाचलमध्ये सरकार स्थापनेसाठी जोरदार प्रचार करणाऱ्या आम आदमी पक्षाला आपले खातेही उघडता आलेले नाही. आत्तापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, काँग्रेसने 36 जागा जिंकल्या असून 4 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने 23 जागा जिंकल्या आहेत आणि 2 जागांवर आघाडीवर आहे तर अपक्षांनी 3 जागांवर विजय मिळवला आहे.

You Might Also Like

Стратегия торговли: Ретесты

ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपनीवर लावले निर्बंध

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

TAGGED: #Decided #new #ChiefMinister #Gujarat #BhupendraPatel #lotus #flower #BJP #NarendraModi, #ठरलं #गुजरात #नवे #मुख्यमंत्री #भाजपा #कमळ #फुलले #नरेंद्रमोदी #भूपेंद्रपटेल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । शेतकऱ्यांची फसवणूक : आमदार शिंदेच्या मुलांसह सातजणांवर गुन्हा
Next Article सोलापूर शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी चेतन नरोटे, मुंबईत दिले नियुक्तीपत्र

Latest News

Стратегия торговли: Ретесты
Top News November 28, 2025
तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?