Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमृता फडणवीसांचे नवे गाणे, रोहित पवारांकडून कौतुक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

अमृता फडणवीसांचे नवे गाणे, रोहित पवारांकडून कौतुक

Surajya Digital
Last updated: 2021/03/09 at 10:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याचा छंद आहे. आपली नोकरी सांभाळत त्यांनी आपली गाण्याची आवड जोपासली आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. कधी याच गाण्यांमुळे ट्रोल झालेल्या अमृता फडणवीसांना रोहित पवारांनी कौतुकाची दाद दिली आहे.

जागतीक महिला दिनानिमीत्त अमृता फडणवीस यांनी नाट्यसंगीतावर आधारीत नवीन गाण्याचा 28 सेकंदाचा व्हिडीओ ट्वीट केला. या गाण्याचे बोल “कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी..” असे आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्याचं आणि त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,’काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण @fadnavis_amruta ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!’

या गाण्याची पोस्ट शेअर करण्यापूर्वी त्यांनी ट्रोलर्स इशारा दिला होता. आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये “कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी! हे प्रेरणादायी गीत नक्की ऐका” असं म्हटलं आहे.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #Newsong #AmritaFadnavis #appreciation #RohitPawar, #अमृताफडणवीस #नवेगाणे #रोहितपवारांकडून #कौतुक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोना ब्रेकिंग ; या ठिकाणी जाण्यासाठी ई-पास बंधनकारक
Next Article बिग ब्रेकिंग – जळगावमध्ये तीन दिवस कडक जनता कर्फ्यू

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?