Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नवदापंत्य लग्न मंडपातून थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात; कोरोना टेस्ट केल्यानंतरच केला गृहप्रवेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

नवदापंत्य लग्न मंडपातून थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात; कोरोना टेस्ट केल्यानंतरच केला गृहप्रवेश

Surajya Digital
Last updated: 2020/08/22 at 3:59 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

टेंभुर्णी : कोरोनाच्या भयामुळे अवघे जग त्रासलेले असताना शासनाने नागरिकांच्या अँटीजन रँपीड टेस्ट करुन घेण्याचे सत्र राबविले असले तरी कोरोनाच्या भीतीमुळे चाचणी करण्यासाठी नागरिकांतून प्रतिसाद मिळत नाही. अशात मात्र काल शुक्रवारी बेंबळे येथोल एका नवदापंत्याने लग्नमंडपातून थेट आरोग्य केंद्र गाठले. अँन्टीजेन रँपीड टेस्ट केल्यानंतरच गृहप्रवेश केला. यामुळे नवदाम्पत्याचे सर्वञ कौतुक केले जात आहे.

बेंबळे येथील बापु सोपान शिंदे यांचे चिरंजीव शंभु याचा विवाह इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे मधुकर गोपाळ शिंदे यांच्या श्रावणी या मुलीशी झाला. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पडला. लग्न सोहळा उरकून घरी परतत असताना बेंबळे येथे गावी आल्यानंतर घरी जाण्याऐवजी थेट बेंबळे येथील प्राथमिक उपकेंद्रात वधू वर दाखल झाले.

या केंद्रात परिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. भारती आपल्या टीमसह कोरोना चाचणी घेत होत्या.  नवरा – नवरी लग्नमंडपातून या आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करण्यासाठी आले आहेत, असे समजल्यानंतर सर्व गावक-या समक्ष त्यांची अँन्टीजेन रँपीड टेस्ट (कोरोना चाचणी) घेतली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी कुर्डुवाडी पंचायत समितीचे माजी सभापती बंडुनाना ढवळे उपस्थित होते. त्यांनी या शिंदे नवदापंत्याचे कौतुक केले. कोरोना चाचणी करणे किती गरजेचे व महत्वाचे आहे हे पटवून सांगितले. सर्व नागरिकांनी स्वतः पुढे आले पाहिजे. या नव वरवधूने आपल्या पुढे एक आदर्श ठेवला असून या कोरोना चाचणीचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. आपल्या परिसरात जास्तीत जास्त अँन्टीजेन रँपीड टेस्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देवू, अशी ग्वाही बंडुनाना ढवळे यांनी दिली.

यावेळी विजय खटके, सचिन पवार व गावातील दुकानदार, भाजीविक्रेते, हॉटेलचालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही चाचणी व्यवस्थित पार पाडण्यासाठी परिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ.भारती, आरोग्यसहाय्यक पी.एस. पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व्ही.डी.वास्ते, महेश शिंदे, आरोग्यसहाय्यिका शोभा पवार, कोरे आदींनी परिश्रम घेतले.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #नवदांपत्य #वधूवर #कोरोनाचाचणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पगार थकल्याने औरंगाबाद रुग्णालयात डॉक्टरांचे कामबंद आंदोलन; म्हणे राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ केली
Next Article महिलेवर 143 जणांनी केला बलात्कार; 42 पानांचा FIR; सासर, राजकारणी, पत्रकारांह अनेकांवर आरोप

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?