Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अनर्थ टळला : नूतन जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; भाजपाच्या मंत्र्यांची मध्यस्थी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अनर्थ टळला : नूतन जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; भाजपाच्या मंत्र्यांची मध्यस्थी

Surajya Digital
Last updated: 2023/07/06 at 7:11 PM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ रे नगर प्रकल्पासाठी शनिवारी, रविवारी केंद्रातील अधिकारी सोलापुरात

● पंचनामासाठी घटनास्थळी पथक जाणार, बोअर चोरीला गेल्याचे प्रकरण

सोलापूर : माढा तालुक्यातील मानेगाव ग्रामपंचायत हद्दीतील माळी स्मशानभूमी जिल्हा परिषदेच्या चौदाव्या वित्त आयोगातून घेतलेल्या बोअरच्या निधीचा गैरवापर राष्ट्रवादीचे सदस्य, ग्रामसेवक ,विस्तार अधिकारी यांनी मनमानी कारभार करत केला आहे.  Disaster averted: Self-immolation attempt at Newan Collectorate; Mediation of BJP ministers Solapur Girish Mahajan या संदर्भात वारंवार तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याने बुधवारी आलम जमादार आणि दीपक देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विषारी औषध प्राशन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. सदर प्रकरणात भाजपाचे एका मंत्राने लक्ष घालत मध्यस्थी केल्याने घटना तळ्याची पाहणी करण्यासाठी एक पथक पंचनामेसाठी जाणार आहे.

 

ग्रामपंचायत 14 व्या वित्त आयोगातून मारलेला बोअर चोरीला गेला आहे. त्याची वारंवार तक्रार सोलापूर जिल्हा परिषद व कुर्डुवाडी पंचायत समितीकडे केली. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चौकशी केली गेली नाही तसेच या प्रकरणाबाबत पूर्ण कागदपत्रे पुरावे सादर केली असताना देखील कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे आलम जमादार आणि दीपक देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन यासंदर्भात रितसर कारवाई करावी दोषींवर गुन्हे दाखल करावे अन्यथा 5 जुलै रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार जमादार आणि देशमुख हे पोलिसांची नजर चुकवून बुधवारी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयात आले. मात्र या दोघांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट जवळच अडवले आणि त्यांची झाडाझडती घेत त्यांच्या खिशातून विषयाची बाटली काढून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले

मानेगाव ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना ग्रामसेवक तलाठी आणि विस्तार अधिकारी यांना हाताशी धरून दोन ते अडीच लाख रुपयांचा बोअर घोटाळा केला आहे. जागेवर बोअर नसताना बोअर मारल्याचे खोटी कागदपत्रे दाखवत सदरचा निधी हडप केल्याचा आरोप या भाजपाच्या सदस्यांनी केला आहे.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दोघांनी आपले गॉडफादर विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांना मोबाईल द्वारे संपर्क साधला. त्यानंतर मंत्रालयातून जिल्हा प्रशासनाचा फोन वाजला अन जिल्हा प्रशासनामध्ये एकच धावपळ सुरू झाली. या दोघांची भेट निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्याशी करून देण्यात आली. सदरची तक्रार शमा पवार यांना सांगितल्यानंतर सहा दिवसांमध्ये सदर प्रकरणाचा पंचनामा करून घटनास्थळी व्हिडिओ चित्रीकरण पाहणी केली करण्याचे आश्वासन दोघांना दिले.

मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर जिल्हा परिषदची यंत्रणा देखील गतिमान झाली. सामान्य प्रशासन विभागाने कुर्डुवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि उप विभागीय अभियंता यांना पत्र पाठवत या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसाच्या आत या प्रकरणाचा अभिप्राय सादर करण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बोअर न घेता पैसे हडप केल्याची तक्रार आम्ही केली होती. दखल न घेतल्याने आम्ही जिल्हा प्रशासना यापूर्वी आत्मदहनाचा इशारा दिला होता. कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले मात्र पोलिसांमुळे आमचा प्रयत्न फसला. आम्ही आमचे गॉडफादर गिरीश महाजन यांना फोन करुन हकीकत सांगितली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली. सात दिवसात तर कारवाई नाही झाल्यास पुन्हा आम्ही आत्मदहन करू, असे तक्रारदार आलम जमादार यांनी म्हटलंय.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ रे नगर प्रकल्पासाठी शनिवारी, रविवारी केंद्रातील अधिकारी सोलापुरात

सोलापूर : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कुंभारीच्या माळरानावर साकारत असलेल्या रे नगर गृहप्रकल्पातील 30 हजार पैकी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांच्या हस्तांतरणासाठी हालचालींना वेग आला आहे. याचा पाठपुरावा थेट दिल्लीतील पंतप्रधान आवास योजना कार्यालयातून करण्यात येत आहे.

दरम्यान, येत्या 8 व 9 जुलै रोजी केंद्रातील वरिष्ठ अधिकारी या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी सोलापूर दौर्‍यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज बुधवारी पुण्यातून दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला.

ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या पाठपुराव्यातून कुंभारी परिसरात सुमारे 30 हजार घरांचा प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे घरकूल उभारणीबरोबरच या प्रकल्पात मुलभूत व पायाभूत सुविधा युध्दपातळीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

 

पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांच्या चाव्या येत्या नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. या सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी रे नगर फेडरेशन सज्ज झाले असून लाभार्थ्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. याचा पाठपुरावा थेट पंतप्रधान आवास योजना कार्यालयातून होत आहे. यासाठी 8 व 9 जुलै रोजी पंतप्रधान आवास योजना कार्यालयातून केंद्रीय स्तरावरचे अधिकारी येत आहेत.

हा दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी शंभरकर हे पुण्यात असतानाही त्यांनी तातडीची बैठक घेऊन व्हीसीद्वारा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, रे नगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख मेजर, विकासक अंकुर पंधे, अभियंता मेहुल मुळे, लक्ष्मण माळी, वीरेंद्र पद्मा, अ‍ॅड. अनिल वासम उपस्थित होते.

रे नगर येथे वीज, 24 तास पाणी, मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते, पथदिवे, शाळा, अंगणवाडी, वनीकरण यासारख्या महत्वाच्या विषयावर सर्व संबंधित खात्याचे अधिकार्‍यांशी स्वतः जिल्हाधिकारी शंभरकर यांनी संपर्क साधून आढावा घेतला. तसेच काम युद्धपातळीवर पूर्ण होण्यासाठी येत असलेल्या समस्या व त्यासाठी करावी लागणारी उपाययोजना, लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अत्यल्प व्याज दरात कर्जाची उपलब्धता करून देण्यासंदर्भात सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापकांशी ही जिल्हाधिकार्‍यांनी चर्चा केली.

 

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #Disaster #averted #Self-immolation #attempt #Newan #Collectorate #Mediation #BJP #ministers #Solapur #GirishMahajan, #अनर्थ #टळला #नूतन #जिल्हाधिकारी #कार्यालय #आत्मदहन #प्रयत्न #सोलापूर #भाजपा #मंत्री #मध्यस्थी #गिरीशमहाजन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष; शरद पवारांनी उद्या बोलावली बैठक, आमदारांना हॉटेलमध्ये हलवले
Next Article सोलापुरात भाजपच्या बड्या नेत्यासह पाच माजी नगरसेवकांचे राजीनामे

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?