Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । सिव्हिल चौकातील कचराकुंडीत आढळले नवजात अर्भक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

सोलापूर । सिव्हिल चौकातील कचराकुंडीत आढळले नवजात अर्भक

Surajya Digital
Last updated: 2022/12/13 at 10:27 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयासमोरील संरक्षक भिंतीजवळ असलेल्या कचराकुंडीत एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. Solapur. A newborn baby was found in a garbage dump in Civil Chowk

Contents
□ अंबिका नगरात विवाहित इसमाची गळफासाने आत्महत्यास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● देवस्थानच्या ट्रस्टी वरून मारहाण; दोघा जणांवर गुन्हा

हे अर्भक सिव्हिल हॉस्पिटमधील की अन्य रुग्णालयातील याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. आज मंगळवारी (ता. 13) दुपारी एकच्या सुमारास संरक्षक भिंतीजवळ कचरा वेचण्यासाठी आलेल्या एका महिलेला एक कॅरीबँगेमध्ये अर्भक दिसले. त्या महिलेने परिसरातील नागरिकांना याबाबतची माहिती सांगितली. त्यानंतर जेल रोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हे अर्भक शासकीय रुग्णालयात दाखल केले.

परंतु उपचारापूर्वीच बालकाचा मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी हे मृत अर्भक कोणाचे आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरु केले आहे. ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूत झालेल्या महिलेचे की अन्य हॉस्पिटलमधील आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

 

□ अंबिका नगरात विवाहित इसमाची गळफासाने आत्महत्या

सोलापूर – अक्कलकोट रोड परिसरातील अंबिका नगरात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (ता.13) मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

योगीनाथ मल्लय्या हिरेमठ (वय ३८ रा. अंबिका नगर) असे मयताचे नाव आहे. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरातील पहिल्या मजल्यावर असलेल्या खोलीतील छताच्या लोखंडी अँगलला त्याचा मृतदेह वायरने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

मयत योगीनाथ हिरेमठ हा मजुरी करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि आई असा परिवार आहे. तो दुपारी घरी येऊन भांडण करीत होता. त्यामुळे त्याची पत्नी आणि मुले माहेरी गेले होते. यादरम्यान त्याने आत्महत्या केली. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार कांबळे पुढील तपास करीत आहेत.

 

● देवस्थानच्या ट्रस्टी वरून मारहाण; दोघा जणांवर गुन्हा

सोलापूर – कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री वेंकटेश देवस्थानच्या विश्वस्त पदाच्या वादातून घरात घुसून मारहाण केल्याची घटना पंढरपूर येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.या प्रकरणात पंढरपूर शहरच्या पोलिसांनी एका महिलेसह दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
यासंदर्भात दीपक उर्फ विक्रम वासुदेव वाडदेकर (वय ४९ रा.भक्ती मार्ग पंढरपूर) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी अमर उर्फ पिंटू औदुंबर आराध्ये आणि सुनंदा औदुंबर आराध्ये (रा.भक्ती मार्ग पंढरपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
काल सोमवारी दुपारच्या सुमारास दोघेजण  घरात आले. कासेगाव येथील देवस्थानचे  मला अध्यक्षपद नको. त्याच्या बदल्यात पैसे द्या. असे म्हणत त्यांनी धक्काबुक्की करून धमकी दिली.असे वाडेकर यांच्या फिर्यादीत नमूद आहे. सहाय्यक निरीक्षक सोनकांबळे पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना

देशभरात मान्सूनचा जोर; मप्र-राजस्थानात पूरस्थिती, वीज कोसळून, बुडून पाच जणांचा मृत्यू

राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून उज्ज्वल निकमांसह चौघे राज्यसभेवर

दिग्गज दाक्षिणात्य अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन

भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका ३-२ ने जिंकली

TAGGED: #Solapur #newborn #baby #found #garbage #dump #CivilChowk #governmenthospital, #सोलापूर #सिव्हिल #चौक #कचराकुंडी #आढळले #नवजात #अर्भक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोट ते जेऊर रस्ता होणार साडेपाच मीटरचा; आणखी निधी खेचून आणू
Next Article आमदार विजयकुमार देशमुख आले शर्ट बदलून; म्हणाले असे काही घडलेच नाही

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?