Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नव्या शैक्षणिक धोरणाचे राहुल गांधींची माफी मागत या काँग्रेस नेत्या, अभिनेत्रीने केले स्वागत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुडराजकारण

नव्या शैक्षणिक धोरणाचे राहुल गांधींची माफी मागत या काँग्रेस नेत्या, अभिनेत्रीने केले स्वागत

Surajya Digital
Last updated: 2020/07/31 at 9:53 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : मोदी सरकारनं नवं शैक्षणिक धोरण मंजूर केलं. तब्बल ३४ वर्षांनी देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. याबद्दल सध्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचं स्वागत केलं आहे. पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळं मतं मांडल्याबद्दल त्यांनी ट्विट करून काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची माफीदेखील मागितली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल माझी भूमिका पक्षापेक्षा वेगळी आहे. त्यासाठी मी राहुल गांधींची माफी मागते. मात्र मी कटपुतली किंवा रोबोटप्रमाणे मान न डोलावता तथ्यांवर भाष्य करते. प्रत्येक मुद्द्यावर आम्ही आमच्या नेत्याशी सहमत असू शकत नाही. मात्र नागरिक म्हणून आपलं मत व्यक्त करू शकतो, असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राजकारण केवळ गोंधळ घालण्यासाठी नाही. राजकारणात एकत्र येऊनही काम करायला हवं, असं मत सुंदर यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमधून व्यक्त केलं आहे. ‘राजकारण म्हणजे निव्वळ गोंधळ नव्हे, ही गोष्ट भाजपा आणि पंतप्रधान कार्यालयानं समजून घ्यायला हवी. विरोधी पक्ष म्हणून आम्ही याकडे बारकाईनं लक्ष घालू आणि त्यातल्या त्रुटी दाखवू. सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणेबद्दलच्या त्रुटींवरून प्रत्येकाला विश्वासात घ्यायला हवं,’ असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

* भाजपमध्ये जाणार नाही

नव्या शैक्षणिक धोरणाचं स्वागत करणाऱ्या सुंदर यांनी आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं पुढील ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. ‘संघाशी संबंधित मंडळी रिलॅक्स राहू शकतात. पण त्यांनी आनंदीत होऊ नये. मी भाजपात जाणार नाही. माझं मत पक्षापेक्षा वेगळं असू शकतं. कारण मी स्वतंत्र मतं असणारी व्यक्ती आहे. नव्या शैक्षणिक धोरणात त्रुटी आहेत. पण आम्ही सकारात्मकपणे बदलांकडे पाहू शकतो,’ असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

You Might Also Like

अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर

जो लढणार नाही त्यांच्यासाठी येणारा काळ खूप कठिण – आमदार टी. राजासिंह

टीका-आरोपांना कामातून उत्तर दिल्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो – एकनाथ शिंदे

राहुल गांधींची पंतप्रधानांवर विखारी टीका

राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत

TAGGED: नवंशैक्षणिकधोरण #राहुलगांधीमाफी #खुशबू # सुंदर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्तव्यावर हजर न होणाऱ्या सांगलीतल्या सेवा सदन लाईफलाईन रुग्णालयातील आठ जणांवर गुन्हा
Next Article श्री राम मंदिर भूमिपूजनादिवशी न्यूयॉर्कमध्ये 17 हजार चौरस फुटांचा एलईडीवर ‘श्री राम’ झळकणार

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?