Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री राम मंदिर भूमिपूजनादिवशी न्यूयॉर्कमध्ये 17 हजार चौरस फुटांचा एलईडीवर ‘श्री राम’ झळकणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

श्री राम मंदिर भूमिपूजनादिवशी न्यूयॉर्कमध्ये 17 हजार चौरस फुटांचा एलईडीवर ‘श्री राम’ झळकणार

Surajya Digital
Last updated: 2020/07/31 at 1:34 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

न्यूयॉर्क : श्री राम मंदिर भूमिपूजना दिवशी न्यूयॉर्कमध्ये 17 हजार चौरस फुटांचा एलईडी स्क्रीन सकाळी 8 वाजल्यापासून ‘जय श्रीराम’ अशी अक्षरे हिंदी आणि इंग्रजीतून झळकणार आहे. अशा स्वरुपाचा जगातील सर्वात मोठा डिजिटल बोर्ड असणार आहे.

या बोर्डावर त्याबरोबर श्रीरामांचे चित्र, व्हिडीओ, नियोजित राममंदिराचे 3 डी संकल्पना चित्र, या मंदिराचे डिजाईन, आर्किटेक्‍चरशी संबंधित चित्रे आणि पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यस हे सर्वकाही या अशा अनेक बिलबोर्डवर झळकणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भारतीय समुदायाचे सदस्य 5 ऑगस्ट रोजी टाइम्स स्क्वेअर येथे हा क्षण साजरा करण्यासाठी मिठाई वाटप करतील. असा क्षण आयुष्यात एकदा किंवा शतकात एकवेळ येत नसतो. तर मानवजातीच्या जीवनात एकदा येणारी ही घटना आहे. रामजन्म भूमी शिलान्यास साजरा करण्यासाठी आम्हाला ‘टाइम्स स्क्वेअर’ यापेक्षा उत्कृष्ट जागा आणि निमित्त तरी दुसरे कोणते असू शकेल, असे भारतीय समुदायाचे प्रसिद्ध नेते आणि अमेरिकन इंडिया पब्लिक अफेयर्स कमिटीचे अध्यक्ष जगदीश सेहानी यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आयोध्येत राममंदिराचा शिलान्यास करतील तो ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी मोठी जय्यत तयारी न्यूयॉर्क शहरामध्ये करण्यात आल्याचे सांगितले.

भगवान श्री राम आणि अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या नियोजित राममंदिराची भव्य 3 डी प्रतिमा न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम स्क्‍वेअरमध्ये साकारली जाणार आहे. अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राममंदिराच्या भूमीपूजनाच्या दिवशीच एका भव्य बिलबोर्डवर प्रकाश किरणांनी या प्रतिमा साकरल्या जाणार आहेत. राममंदिराचे भूमिपूजन ही एक ऐतिहासिक घटना असेल म्हणून या घटनेला सर्व जगासमोर विशेष प्रसिद्धी देण्याच्या हेतूने भगवान राम आणि नियोजित राममंदिराच्या त्रिमितीतील प्रतिमा प्रकाश किरणांच्या माध्यमातून भव्य पडद्यावर साकारल्या जाणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #न्यूयार्क #श्रीराम #झळकणार #
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नव्या शैक्षणिक धोरणाचे राहुल गांधींची माफी मागत या काँग्रेस नेत्या, अभिनेत्रीने केले स्वागत
Next Article कर्ज फेडण्यात अपयश आल्याने येस बँकेने घेतला रिलायन्स भवनचा ताबा

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?