अहिल्यानगर 9 एप्रिल (हिं.स.) : बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वा खाली ग्रामीण विकासात मापदंड ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या निळवंडे,करुले सोसायटीवर बाळासाहेब थोरात गटाने विरोधी गटाचा 13 – 0 असा मोठा पराभव करून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. याचबरोबर नव्याने झालेल्या सोसायटी निवडणुकीत काकडवाडीसह निळवंडे करुले सोसायटीवर थोरात गटाने मोठ्या मताधिक्याने एकहाती वर्चस्व राखले आहे.
निळवंडे करुले सोसायटी ही तळेगाव गटातील अत्यंत प्रतिष्ठेची सोसायटी आहे या सोसायटीवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे वर्चस्व होते 2025 – 30 या सालाकरता झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाचे 13 ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातून पवार सुभाष शिवनाथ, पवार बाळासाहेब राजाराम, पवार पोपट रामभाऊ, उकिरडे रावसाहेब रामभाऊ, पवार हरिभाऊ खंडू, आहेर बाबासाहेब निवृत्ती, आहेर लहानु पुंजा, पठाण मोहम्मद खुदबुद्दीन तर महिला राखीव मधून पवार ज्योती गणेश व शेटे छाया राजाराम, भटक्या जाती विमुक्त जमाती मधून वारे भाऊसाहेब सहादू, अनुसूचित जाती जमाती मतदार संघामधून उंबरेड अशोक श्रावण, आणि इतर मागास वर्ग मतदारसंघातून पवार सुभाष शिवराम हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.या सर्व विजयी उमेदवारांनी विजयानंतर बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली.