Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फरार स्वयंभू बाबा नित्यानंदने केली घोषणा; गणेश चतुर्थीला ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ची करणार स्थापना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

फरार स्वयंभू बाबा नित्यानंदने केली घोषणा; गणेश चतुर्थीला ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ची करणार स्थापना

Surajya Digital
Last updated: 2020/08/18 at 10:17 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेला स्वामी नित्यानंद गेल्या काही वर्षांत विविध आरोपांमुळे चर्चेत राहिला आहे. आता माहिती मिळत आहे की, नित्यानंदने सांगितले आहे की, देश ‘कैलास’ मध्ये ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ स्थापन केली जाणार आहे. यासाठी, विशेष चलन व्यवहारात आणण्याव्यतिरिक्त ते इतरत्र वैध ठरावे यासाठी, विविध देशांशी काही करार झाले आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त २२ ऑगस्ट रोजी हिंदू रिझर्व्ह बँकेची स्थापना करून, त्याच दिवशी नवीन चलन बाजारात आणले जाणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून, धोरणात्मक कागदपत्रे तयार केली गेली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. स्वामी नित्यानंद म्हणाला की, या संदर्भात अनेक देशांशी करार झाले आहेत आणि जगभरातील देणग्या म्हणून मिळालेली रक्कम ही निर्मिती आणि व्यवहार करण्यासाठी वापरली जाईल. या घोषणेनंतर, नित्यानंद याची छायाचित्रे असलेल्या नोटा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नित्यानंद स्वामीने आपल्या संकेतस्थळाद्वारे इक्वाडोरहून एक छोटेसे बेट खरेदी करून, स्वतःचा नवा देश ‘कैलास’ स्थापन केल्याची घोषणा केली. त्यासाठी पासपोर्ट, ध्वज आणि राष्ट्रीय चिन्ह डिझाइन केले गेले आहे. वेबसाइटनुसार, फरार स्वयंभू बाबा नित्यानंद याने ‘हिंदू सार्वभौम राष्ट्रा’ची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर, त्याच्याकडे तथाकथित ‘कैलास; देशाचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळही आहे.

वेबसाइटमध्ये म्हटले आहे की, नागरिकांना कैलासचा स्वतंत्र पासपोर्ट देण्यात येईल, आणि परमशिवाच्या आशीर्वादाने पासपोर्टधारक कैलाससह इतर 11 देशातील 14 देशांत जगात प्रवेश करू शकतात. या गणेश चतुर्थीला तो या बँकेचं चलनही घोषित करणार आहे. यासंदर्भात नित्यानंदचा स्वतः माहिती देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मिरर नाऊच्या वृत्तानुसार, स्वामी नित्यानंदवर लहान मुलांना आश्रमात डांबून ठेवण्यासह इतर बलात्कारप्रकरणी आरोप आहे. त्याने ५० न्यायालयीन सुनावण्याही चुकवल्या आहेत. भारतातून तो फरार झाला असून इंटरपोलनं त्याला ब्ल्यू कॉर्नर नोटीसही बाजवली आहे. मात्र, अद्यापही तो मुक्तपणे वावरत असून भविष्यातील विविध योजना आखत आहे. बलात्कार प्रकरणाची अहमदाबादमधील नित्यानंदबाबतची सुनावणी करोनाच्या संकटामुळं थांबवण्यात आली होती. मात्र, आता पुढील सुनावणी याच महिन्यांत कर्नाटकमध्ये होणार आहे.

नित्यानंदने अमेरिकेतील एका बेटावर स्थापन केलेल्या ‘कैलास’ या देशाच्या बँकेची स्थापना केली आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तो सांगतो की, “बँक आणि तिची आर्थिक धोरणं तयार आहेत. येत्या गणेश चतुर्थीला आम्ही ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ आणि त्याच्या चलनासंबंधी सर्व माहिती जाहीर करणार आहोत.”

* कायदेशीर प्रक्रियांचे केले पालन

नित्यानंद आपल्या व्हिडिओमध्ये हे देखील सांगतो की, “३०० पानांची आर्थिक धोरणांसंबंधीची कागदपत्रे, चलन आणि त्याचा वापर याबाबत सर्वकाही तयार आहे. यासंदर्भात कैलास या देशासोबत यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला असून आम्हाला ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ स्थापन करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ही संस्था कायदेशीर असणार आहे.”

* नित्यानंदचा गुन्हेगारी इतिहास

कर्नाटक  आणि गुजरातमध्ये आश्रमांची उभारणी करून अध्यात्माच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या नित्यानंद स्वामीने, बलात्काराच्या घटनेपासून स्वत: ला वाचवण्यासाठी पासपोर्टविना भारतामधून पळ काढला होता. स्वामी नित्यानंद हा सन २०१० मधील बलात्कार प्रकरणातील आरोपी असून जामिनावर त्याची सुटका झाली होती. त्यानंतर तो देशातून पळून गेला. दरम्यान, फेब्रुवारी २०२० रोजी कर्नाटक हायकोर्टाने त्याचा जामीन रद्द केला. गुजरातमधील आश्रमात त्याने लहान मुलांना बेकायदेशीररित्या बंदिस्त केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

You Might Also Like

कोल्हापूर: कळंबा जेल परिसरातील घरात पाईपलाईनच्या गॅसचा स्फोट; चौघे जखमी

सुप्रीम कोर्टाकडून ‘वनतारा’ प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश; माजी न्यायाधीशांची समिती

इम्रान खान यांच्या पक्षाच्या ७५ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना न्यायालयाने सुनावली शिक्षा

अमेरिकेत एच-१बी व्हिसा बंद होण्याची शक्यता; रिपब्लिकन सिनेटरचे विधान

पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या

TAGGED: #नित्यानंद #फरारस्वयंमघोषित #कैलासबँक #लैंगिकछळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article व्याजाच्या रकमेसाठी तरुणावर जीवघेणा हल्ला; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह पाच जणांवर गुन्हा
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 नवे रूग्ण; 9 जणांचा मृत्यू

Latest News

कोल्हापूर: कळंबा जेल परिसरातील घरात पाईपलाईनच्या गॅसचा स्फोट; चौघे जखमी
देश - विदेश August 26, 2025
सुप्रीम कोर्टाकडून ‘वनतारा’ प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश; माजी न्यायाधीशांची समिती
देश - विदेश August 26, 2025
इम्रान खान यांच्या पक्षाच्या ७५ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना न्यायालयाने सुनावली शिक्षा
देश - विदेश August 26, 2025
अमेरिकेत एच-१बी व्हिसा बंद होण्याची शक्यता; रिपब्लिकन सिनेटरचे विधान
Top News देश - विदेश August 26, 2025
aurangabad-gopinath-munde-farmer-accident-insurance-scheme-beneficiaries
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
महाराष्ट्र August 26, 2025
पित्याने केली मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या
Top News August 26, 2025
मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?