Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विनायक मेटे यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार, अपघातानंतर तासभर मदत मिळाली नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

विनायक मेटे यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार, अपघातानंतर तासभर मदत मिळाली नाही

Surajya Digital
Last updated: 2022/08/14 at 12:44 PM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

 

Contents
□ विनायक मेटेंच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश□ अपघातानंतर तासभर मदत मिळाली नाहीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ विनायक मेटे यांचा जागेवरच मृत्यु झाला – डॉक्टर□ पोलिसांचा कयास⭕ या ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे, चालकाने काय सांगितले?□  मुख्यमंत्री शिंदे यांची भेट 

मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. अशातच आता विनायक मेटे यांच्या पार्थिवावर 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता शहरातील कॅनॉल रोडवरील एका शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. Funeral of Vinayak Mete tomorrow, no help received for an hour after the accident, inquiry ordered

आज सकाळी महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचं निधन झाले आहे. ते आज बैठकीसाठी मुंबईला येत होते. त्यावेळेस मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये विनायक मेटेंना गंभीर जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. आज दुपारी मुख्यमंत्र्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी बीडहून मुंबईला येत होते.

 

□ विनायक मेटेंच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज अपघाती निधन झालं. विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, यावर अजूनही माझा विश्वास बसला नाही ही अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार विनायक मेटे यांच्या कुटुंबासोबत आहे.

विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याने घटनास्थळावरून लोकांना मदतीचे आवाहन केले पण कोणीही समोर आले नाही तसेच सरकारी हेल्पलाईनला देखिल कळवले तरीही विनायक मेटे तब्बल 1 तास पडून होते. पोलिसांना देखिल 100 नंबर वरून अपघाताची माहिती दिली पंरतु कसलीही मदत मिळाली नाही. यावर मुख्यमंत्र्यांनी आरोपांच्या बाबतीतील माहिती तपासून घेतली जाईल असे म्हटले आहे.

□ अपघातानंतर तासभर मदत मिळाली नाही

महाराष्ट्रात शिवसंग्राम नेते विनायक मेटे आणि राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

विनायक मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील अपघातावेळेस त्यांच्यासोबत होते. कदम यांच्याशी वृत्तवाहिनीने संवाद साधला, त्यावेळी त्यांनी सांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली.

एका तासानंतर तिथं ॲम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं ते म्हणाले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ विनायक मेटे यांचा जागेवरच मृत्यु झाला – डॉक्टर

 

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज सकाळी अपघातात निधन झाले आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा अपघात झाला. त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. आज रविवारी (ता.14) पहाटे पाच वाजता त्यांचा अपघात झाला. मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे, असे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

□ पोलिसांचा कयास

विनायक मेटे दुसऱ्या रांगेतील सीटवर बसले होते.
पोलीस सुरक्षारक्षक पुढे बसला होता. मेटेंच्या कार चालकाने थर्ड लेनमधून मध्यल्या लेनमध्ये येण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच ट्रकचालकही लेन बदलत होता.

मेटेंची गाडी वेगाने असल्याचा संशय असून चालकाला गाडी कंट्रोल झाली नाही. यामुळे गाडी डाव्याबाजुने ट्रकवर आदळली. एअरबॅग उघडली, मेटे मागे झोपले होते. अचानक पुढे आदळल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. अपघातानंतर दहा टायरचा ट्रक थांबला नाही, चालक ट्रक घेऊन पळून गेल्याची माहिती आहे.

 

⭕ या ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे, चालकाने काय सांगितले?

 

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांचा अपघात झाला.
यानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंचा चालक एकनाथ कदम यांनी केला.

त्यांनी मी रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण एकही गाड्या थांबल्या नाहीत.
मला मुका मार लागला आहे. गार्डना थोडा मार बसला आहे. एअरबॅग होत्या म्हणून आम्ही वाचलोय,

 

□  मुख्यमंत्री शिंदे यांची भेट 

 

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज अपघाती निधन झालं. विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, यावर अजूनही माझा विश्वास बसला नाही ही अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार विनायक मेटे यांच्या कुटुंबासोबत आहे.

 

विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याने घटनास्थळावरून लोकांना मदतीचे आवाहन केले पण कोणीही समोर आले नाही तसेच सरकारी हेल्पलाईनला देखिल कळवले तरीही विनायक मेटे तब्बल 1 तास पडून होते. पोलिसांना देखिल 100 नंबर वरून अपघाताची माहिती दिली पंरतु कसलीही मदत मिळाली नाही. यावर मुख्यमंत्र्यांनी आरोपांच्या बाबतीतील माहिती तपासून घेतली जाईल असे म्हटले आहे.असे कदम म्हणाले. छोटा टेम्पो चालकाने मदत केली. दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हलल्याचे चालकाने सांगितले. त्याच्यानंतर आम्हाला रुग्णालयात आणले गेले, असे कदम यांनी सांगितले.

 

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज सकाळी अपघातात निधन झाले आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर हा अपघात झाला. यानंतर त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडली. त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. यावेळी रुग्णालयात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भेट दिली. त्यांचा फोन कधीही बंद लागत नाही, असे सांगताना त्यांच्या पत्नीचा अश्रूंचा बांध फुटला असे पवार म्हणाले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Funeral #VinayakMete #tomorrow #nohelp #received #accident #inquiry #ordered, #विनायकमेटे #पार्थिव #उद्या #अंत्यसंस्कार #अपघातानंतर #तासभर #मदत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्राला धक्का : शेअर मार्केटमधील बादशहा राकेश झुनझुनवाला यांचे निधन
Next Article तब्बल ११ ऑटोरिक्षा चोरणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे शाखेची कामगिरी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?