Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘टाइम’च्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत एकही भारतीय नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

‘टाइम’च्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत एकही भारतीय नाही

admin
Last updated: 2025/04/17 at 4:38 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

लंडन , 17 एप्रिल (हिं.स.)।टाइम मॅगझीनने २०२५ मधील जगातील सर्वात १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यापर्यंत अनेकांची नावे आहेत. मात्र, या यादीत एकाही भारतीयाचं नाव नसल्याचं पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

यावेळी या यादीत एकाही भारतीयाचा समावेश नाही. टाइम मासिकाच्या याआधीच्या वर्षांमधील प्रभावशाली व्यक्तींच्या याद्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भारतीयांचा समावेश केला जात होता. मात्र, यंदा टाइमने एकाही भारतीयाची दखल घेतलेली दिसत नाही. यंदाच्या यादीत ट्रम्प यांच्यासह टेस्ला, स्पेसएक्स व एक्सचे मालक तथा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क देखील आहेत.याशिवाय, बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे. खरे तर, या यादीत दरवर्षी एका तरी भारतीयाचे नाव असते. २०२४ मध्ये, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि ऑलिंपिक कुस्तीगीर साक्षी मलिक यांचा या यादीत समावेश होता.

मात्र, या वर्षी या यादीत एकही भारतीय नाही. त्यामुळे अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. २०२५ ची टाइमची १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आली आहे. त्यांना लीडर्स, टायटन्स, आयकॉन्स अशी नावे देण्यात आली आहेत. या यादीतील ‘लीडर्स’ श्रेणीत ब्रिटनचे पंतप्रधान कीर सार्मर, शांततेचं नोबल मिळालेले मोहम्मद युनूस, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांचा समावेश आहे. भारतीय वंशाच्या रेश्मा केवलरामणी यांना या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र त्या भारतीय नागरिक नाही.

केवलरामणी सध्या व्हर्टेक्स या औषध कंपनीच्या सीईओ आहेत. त्या जेव्हा अमेरिकेला गेल्या तेव्हा केवळ ११ वर्षांच्या होत्या. आता त्या अमेरिकेतील एका प्रसिद्ध बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या सीईओ आहेत. भारतासोबतच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांसारख्या दिग्गजांचाही समावेश नाही. याशिवाय, फ्रान्स आणि जर्मनी सारख्या शक्तिशाली युरोपीय देशांच्या नेत्यांनाही यात स्थान देण्यात आलेले नाही. याचे कारण म्हणजे, टाईम मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत केवळ अशाच नेत्यांना स्थान दिले जाते, जे अलिकडेच समोर आले आहेत आणि ज्यांच्या येण्याने समाजावर काही प्रभाव पडला आहे.

You Might Also Like

केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी

हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी

काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी

अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा

कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात दस्त नोंदणी हाताळणी शुल्कात दुप्पट वाढ
Next Article सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २० एप्रिलला मिरवणूक

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?