Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘कोणीही नाराज नाही; मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका’, यांचा पारा वाढला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

‘कोणीही नाराज नाही; मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका’, यांचा पारा वाढला

Surajya Digital
Last updated: 2021/07/08 at 7:41 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नाशिक : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे गटात कमालीची नाराजी असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावर आता उत्तर दिले आहे. त्यांना या अफवा असून बदनामी केली जात असल्याचा आरोप केलाय.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1413122707214921736?s=19

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून मुंडे भगिनी नाराज, हे कोण म्हणत आहे. अशी काहीही चर्चा नाही. मंत्रिपद वाटपाचा निर्णय, पक्ष वरीष्ठ स्तरावरून घेतला जात असतो. त्यामुळे मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, असे त्यांनी नाशिकमध्ये विधान केले.

मंत्रिमंडळ विस्तारावरून मुंडे भगिनी अजिबात नाराज नाहीत. त्या नाराज आहे असे कोण म्हणतय? असा प्रतिप्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांचा पारा वाढला होता. काल मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुंडे भगिनी नाराज असल्याच्या बातम्यांना पेव फुटले. मंत्रिमंडळ विस्तार असो की पद नियुक्ती याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतला जातो. त्यात कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मंत्र्यांना चांगली खाती मिळाली आहेत. यामुळे त्याचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी नक्कीच होईल. नारायण राणे यांना त्यांच्या कार्यक्षमतेमुळे मंत्रिमंडळात घेतले असावे, असे त्यांनी सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

https://twitter.com/SurajyaDigital/status/1412995969218609155?s=19

राज्यात शिवसेनेला डिवचल्याचा फायदा नारायण राणेंना मिळत असल्याची प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर देवेंद फडणवीस यांनी या आरोपांवर आक्षेप घेतला. नारायण राणेंची क्षमता पाहून मंत्रिपद मिळाले असल्याचे फडणवीस आवर्जून म्हणाले. नारायण राणेंना केंद्रात घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील युतीच्या चर्चेची शक्यता मावळली आहे का? असे विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितले की, अशा चर्चेने काही होत नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1412770881638592515?s=19

प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त आहे. शपथविधी पार पडल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी अभिनंदनाचं ट्वीटदेखील केलं नसल्याने या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. वारसा आणि प्रस्थापित यापेक्षाही भाजप पक्षात  संधी मिळते हा संदेश दिला  जात आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉ. कराड यांना पहिल्यांदाच राज्यसभा आणि वर्षभरातच थेट मंत्रीपद मिळाल्याने मुंडे भगिनी समर्थकांना नेमके काय व्यक्त व्हावे, असा प्रश्न पडला आहे.

पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी केंद्रातील किंवा राज्यातील कोणत्याही मंत्र्याचं अभिनंदन केलं नसून त्या नाराज असल्याची चर्चा असल्याचं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पत्रकार परिषदेत विचारला होता. यावर दरेकर यांनी, अभिनंदन केलं नाही किंवा ट्विट केलं नाही असं सांगताना त्यांनी कुठे नाराजीदेखील व्यक्त केलेली नसल्याचे म्हणत याकडेही लक्ष द्यावं लागेल, असे चाणाक्ष उत्तर दिले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #offended #Munde #don't #slander #Political, #कोणीहीनाराज #मुंडे #भगिनींना #उगाच #बदनाम #करूनका #पारावाढला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Next Article बार्शीच्या सुविधा हॉस्पिटलमध्ये तोडफोड, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?