Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी

admin
Last updated: 2025/06/18 at 7:53 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 18 जून (हिं.स.) : काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मांडली. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी (१८ जून) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली.यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कुणीचीही मध्यस्थी भारताने ना कधी स्वीकारली, ना कधी स्वीकारणार, असे मोदी म्हणाले. यावेळी ३५ मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी७ शिखर परिषदेसाठी कॅनडाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातच पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बैठक होणार होती. पण, डोनाल्ड ट्रम्प मध्येच दौरा सोडून अमेरिकेत परतले.भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कॉलवरून ३५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाबद्दल भारताची भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाबद्दलही ते बोलले. यावेळी पाकव्याप्त काश्मीरचा मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी भारताने कधीही तिसऱ्या देशाला मध्यस्थी करण्याबद्दल विचारले नाही आणि कधीही अशी मध्यस्थी स्वीकारणार नाही,

असे मोदी ट्रम्प यांच्याशी बोलताना म्हणाले.पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना सांगितले की, संपूर्ण घटनाक्रमामध्ये कधीही आणि कोणत्याही पातळीवर भारत-अमेरिकेतील व्यापार करार किंवा अमेरिकेकडून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थ करण्यासंदर्भात चर्चा झाली नाही. तणाव कमी करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातच चर्चा झाली होती. ही चर्चाही पाकिस्तानने आग्रह केल्यानंतर झाली, असे मोदी ट्रम्प यांना म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडून मांडण्यात आलेले मुद्दे समजून घेतले. भारताच्या दहशतवाद विरोधातील लढाईला ट्रम्प यांनी पाठिंबा दिला. भारताचे ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याचेही मोदींनी ट्रम्प यांना सांगितले.दरम्यान, ट्रम्प यांनी कॉलवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांना कॅनडा दौऱ्यावरून परतताना अमेरिकेत येऊ शकता का? अशी विचारले. पण, मोदींनी असमर्थता दर्शवली. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे अमेरिकेत येता येणार नाही, असे मोदी म्हणाले. त्यावर भविष्यात भेटण्याचा प्रयत्न करू असे दोन्ही नेते म्हणाले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील
Next Article पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?