ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, सोन्यावर कर लावण्याचा प्रश्नच नाही. ही घोषणा अशा वेळी झाली आहे जेव्हा ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के कर लादला असून रशियाशीही तणाव सुरू आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिकन कस्टम अधिकाऱ्यांनी १ किलो आणि १०० औंस वजनाच्या सोन्याच्या बारांना कराच्या कक्षेत आणण्याची सूचना असलेले पत्र जारी केले होते. यामुळे सोने व्यापारी आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली होती. ट्रम्प यांच्या घोषणेमुळे आता बाजारात स्पष्टता आली असून व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे सोन्याच्या किमती आणि जागतिक व्यापारात स्थिरता राहण्याची शक्यता आहे
No WhatsApp Number Found!
WhatsApp us
Sign in to your account