Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: थकबाकी न भरल्याने बीएसएनएल सब डिव्हिजन कार्यालयाचे सील जैसे थे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

थकबाकी न भरल्याने बीएसएनएल सब डिव्हिजन कार्यालयाचे सील जैसे थे

Surajya Digital
Last updated: 2023/05/17 at 8:44 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 सुट्टीच्या दिवशीही कामकाज करून संजय गांधी निराधार योजनेचे एकूण 228 प्रकरणे मंजूर

● महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांची माहिती !

सोलापूर : बीएसएनएलने अद्यापही थकबाकी भरली नसल्याने होटगी रोडवरील सब डिव्हिजन कार्यालयाचे सील जैसे थे आहे. दरम्यान, महापालिकेने बीएसएनएलचे बिल अदा केले असल्याची माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली. Due to non-payment of dues, BSNL sub division office seals like Solapur Municipal Corporation

सोलापूर महापालिका मिळकत कर वसुली पथकाकडून मंगळवारी दि. 28 मार्च रोजी होटगी रोडवरील बीएसएनएलचे सब डिव्हिजन कार्यालय 75 लाख 67 हजार 553 रुपयाच्या मिळकत कर थकबाकीपोटी सील करण्यात आले. तसेच येथील पाण्याचे 2 नळही बंद करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांनी थेट महापालिकेत धाव घेऊन मिळकत कराची आकारणी अधिक केल्याचा आक्षेप घेतला होता.

 

दीड महिना उलटला बीएसएनएलच्या संबंधित कार्यालयाने थकबाकी भरली का ? या संदर्भात उपायुक्त पोळ यांना विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. बीएसएनएलच्या हरकतीला कायदेशीर आधार नाही. यामुळे पूर्ण थकबाकी भरल्याशिवाय सील काढण्यात येणार नाही, असे उपायुक्त पोळ यांनी स्पष्ट केले.

महापालिका प्रशासनाने बीएसएनएलचे बिल भरले आहे. त्यामुळे महापालिका आता कोणत्याही प्रकारचे बीएसएनएलला देणे नाही, असेही उपायुक्त विद्या पोळ यांनी सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 सुट्टीच्या दिवशीही कामकाज करून संजय गांधी निराधार योजनेचे एकूण 228 प्रकरणे मंजूर

● प्रभारी तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या कामाने नागरिकांमध्ये समाधान

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर प्रभारी तहसीलदार पदाचा कार्यभार मंद्रूपचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना देण्यात आला असून राजशेखर लिंबारे यांनी शनिवार रविवार या दोन दिवसाच्या सुट्टीच्या दिवशीही कामकाज करून संजय गांधी निराधार योजनेचे एकूण 228 प्रकरणे मंजूर केली.

प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आदेश काढून तहसीलदार दक्षिण सोलापूरच्या प्रभारी तहसीलदार या पदाचा कार्यभार मंद्रूपचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना दिला. राजशेखर लिंबारे यांनी दिनांक ११ मे रोजी कार्यभार स्वीकारून त्वरित संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अधिकारी व कर्मचारी यांची सभा घेऊन प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेतला.

 

शनिवार व रविवार दोन दिवस सुट्टीच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहून विशेष सहाय योजनेअंतर्गत येणाऱ्या संजयगांधी, श्रावणबाळ, राष्ट्रीय वृद्धापकाळ व विधवा या प्रकरणातील सर्व कागदपत्रे तपासणी करून पात्र, अपात्र यादी तयार करणे बाबत सूचना दिल्या.

 

त्यानंतर त्वरित १५ मे रोजी संजयगांधी निराधार अनुदान समितीची बैठक घेऊन संजय गांधी निराधार योजनेचे ७३, लाभार्थी, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचे१०७, राष्ट्रीय विधवा योजनेचे २०, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे २८, असे एकूण २२८ पात्र लाभार्थ्याचे प्रकरणे मंजूर करण्यात आलेले आहेत.

 

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे ७ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. सदर संजय गांधी योजना बैठकीस नायब तहसीलदार आरती दाबडे, अवल कारकून परवीन रंगरेज, महसूल सहाय्यक एस. एल. कुलकर्णी, तसेच आय.टी.असिस्टंट श्रेयस देशपांडे हे उपस्थित होते.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #Due #non-payment #dues #BSNL #subdivision #officeseals #Solapur #Municipal #Corporation, #थकबाकी #भरल्याने #बीएसएनएल #सबडिव्हिजन #कार्यालय #सील #जैसेथे #सोलापूर #महापालिका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भूमिकेमुळे शिंदे गटात पसरली अस्वस्थता
Next Article पंढरपूरला येत असताना भीषण अपघात, सहा जण ठार

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?