Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यभरात भाजपचे आंदोलन : देवेंद्र फडणवीसांना बजावलेल्या नोटिसची सोलापुरात दहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

राज्यभरात भाजपचे आंदोलन : देवेंद्र फडणवीसांना बजावलेल्या नोटिसची सोलापुरात दहन

Surajya Digital
Last updated: 2022/03/13 at 7:36 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मोहोळ :  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडवणीस यांना जाणीवपूर्वक बजावलेल्या चुकीच्या नोटीसच्या  निषेधार्थ आज मोहोळ शहर व तालुका भाजपच्या वतीने नोटीस दहन आंदोलन करण्यात आले.

राज्य सरकारने केलेले मोठ – मोठे घोटाळे बाहेर काढल्यामुळे धास्तावलेल्या सरकारने चुकीच्या पद्धतीने फडणीस यांचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १६० नुसार नोटीस काढण्यात आली आहे. वास्तविक विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी काढलेल्या भ्रष्टाचारावर कारवाई करणे गरजेचे व अपेक्षित असताना सरकारने ‘उलटा चोर कोतवाल को’ या न्यायाने फडणवीस यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात रविवारी नोटीस दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून मोहोळ नगरपालिकेसमोर नोटीस दहन कार्यक्रम करण्यात आला. देवेंद्र फडणीस आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, सरकार भाजप की सरकार, अशा घोषणा दिल्या. नोटिसची च्या प्रती जाळण्यात आल्या.

यावेळी माजी नगरसेवक व शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर ,भाजपा विधानसभा अध्यक्ष दिलीप गायकवाड, प्रज्ञावंत आघाडी तालुकाध्यक्ष अविनाश पांढरे, माजी सैनिक आघाडीचे नागेश मेजर क्षीरसागर, तालुका सरचिटणीस महेश सोवनी, तालुका सरचिटणीस मुजीब मुजावर, शहर सरचिटणीस विशाल डोंगरे, तालुका उपाध्यक्ष द्रोणाचार्य लेंगरे, माजी शहराध्यक्ष अरविंद मानेसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

BJP agitation across the state: Burning of notice issued to Devendra Fadnavis in Solapur

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

● भाजपच्या नेत्यांनी राज्यभर केले आंदोलन

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर पोलिस बदल्यांमध्ये मोठी देवघेव झाल्याचा अहवाल गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी दिला होता.

यावर राज्य सरकराने कोणतीच कारवाई न केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. गोपनीयतेचा भंग आणि टेलग्रॅफिक ॲक्टनुसार मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी येण्याची नोटीस पाठवली. याचा निषेध म्हणून आज भाजपाकडून राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन केले.

नागपूर, पुणे, सांगली या जिल्ह्यात भाजप नेत्यांकडून नोटीस जाळून महाआघाडी सरकारचा निषेध केला.
भाजपच्या नेत्यांनी राज्यभर आंदोलने केली. आमदार गोपिचंद पडळकर यांनीही आज सांगलीतील आटपाडी तालुक्यातील झरे येथे राज्य सरकारच्या या नाकामी कृत्याविरोधात आवाज उठवला. यावेळी भाजप पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी या नोटीसीचे दहन केले. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला. हांडेवाडी चौकमध्ये (ता. हवेली) नोटीशीची होळी करून हवेली तालुक्यात भाजपच्या वतीने निषेध केला.

दरम्यान, प्रविण दरेकर यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं की मला प्रश्नावली पाठवली होती. मला अधिकार आहेत पण प्रश्नावलीसंदर्भात काही शंका असू शकतात. त्यांना पळवाट काढता आली असती. देवेंद्र फडणवीस हे निष्णात वकील आहेत. सध्याच्या परिस्थितीत कशी वाट काढायची त्या पद्धतीने काम करत आहेत. कोणत्याही मोठ्या नेत्याबद्दल असं आक्षेपार्ह वक्तव्य होऊ नये. केवळ नितेश, निलेश राणेंनी वक्तव्य केलं आहे का? तपासून पाहा मोदींविरोधात अशी वक्तव्ये केली आहेत, असंही दरेकर म्हणाले.

 

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

TAGGED: #BJP #agitation #across #state #Burning #notice #issued #DevendraFadnavis #Solapur, #राज्यभर #भाजप #आंदोलन #देवेंद्रफडणवीस #बजावलेल्या #नोटिस #सोलापूर #दहन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुशीलकुमार शिंदेंच्या घरासमोर उपोषण करण्याचा सपाटेंचा इशारा, बिपिनभाई म्हणतात ‘त्या’ जागेवर आमचाच दावा
Next Article प्रसिध्द अभिनेत्रीने पाकिट मारले, पोलिसांनी केली अटक; बॅगेत सापडली हिशेबाची डायरी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?