Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: झाले शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन; आता वाळू मिळणार 600 रूपये ब्रास
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

झाले शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन; आता वाळू मिळणार 600 रूपये ब्रास

Surajya Digital
Last updated: 2023/05/02 at 11:08 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ ॲप आणि संकेतस्थळ जाहीर

अहमदनगर : महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे अहमदनगरच्या नायगाव येथे राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले. आता ही वाळू सर्वसामान्यांना 600 रूपयांना एक ब्रास मिळणार आहे. या आधी यासाठी 3 हजार रूपयांपर्यंत किंवा त्याहून अधिकचे पैसे मोजावे लागत होते. संपूर्ण राज्यामध्ये 10 मे पर्यंत वाळू धोरणाची अंमलबजावणी होईल. मातुलठाण येथील मंगल व्यवहारे या योजनेच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या. Government sand sales center was inaugurated; Now sand will get 600 rupees Brass Mahakanij app website Revenue Minister

 

राज्य शासनाने वाळूचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण नुकतेच जाहीर केले आहे. राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देणे व विकास कामांसाठी आवश्यक असणारी वाळू उपलब्ध व्हावी हा या धोरणाचा प्रमुख उद्देश आहेत. सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात एक ब्रास वाळू घरपोच मिळणार आहे.‌ राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या महाराष्ट्र दिनापासून झाली. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.” असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यसाय विकास मंत्री‌ तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी (ता.1 मे) शिर्डी येथे केले.

 

महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण श्रीरामपूर तालुक्यातील नायगांव येथे महसूलमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री विखे-पाटील‌ बोलत होते. यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, नायगांवचे सरपंच राजाराम राशीनकर, दीपक पठारे आदी उपस्थित होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

त्यांच्याहस्ते ६०० रूपये वाळू ब्रासच्या राज्यातील पहिल्या लाभार्थी मंगल व्यवहारे (रा.मातुलठाण) व नंदा गायकवाड (रा.नायगांव) यांना लाभार्थी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी राधाकिसन दडे व बाळासाहेब वाघचौरे यांनाही वाळू लाभ प्रमाणपत्र देण्यात आले.

 

○ ॲप आणि संकेतस्थळ जाहीर

 

ग्राहकांना ‘महाखनिज’ या ऑनलाईन अॅपवर मागणी नोंदवल्यानंतर ६०० रुपये ब्रास व वाहनाच्या प्रकारानुसार प्रति किलोमीटर दर ठरवून घरपोच वाळू दिली जाणार आहे. एका कुटुंबाला एका महिन्यात जास्तीत जास्त १० ब्रास वाळू उपलब्ध केली जाणार आहे. नायगावचा डेपो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून विविध ठिकाणी डेपो सुरू केला जाणार आहेत. या डेपोतून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टीम असल्याने भष्ट्राचार, अनियमितेला शून्य वाव आहे. या वाळू डेपोंचे काम www.mahakhanij.maharashtra.gov.in या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून चालणार आहे. या संकेतस्थळावर जिल्हानिहाय वाळू साठे व शिल्लक ब्रास यांची आकडेवारी दैंनदिन प्रसिध्द होईल. नागरिक घरबसल्या आवश्यक वाळू ब्रास मागणी ऑनलाईन नोंदवू शकणार आहेत.

You Might Also Like

पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी

भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील

भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

TAGGED: #Government #sandsalescenter #inaugurated #Nowsand #willget #600rupees #Brass #Mahakanij #app #website #RevenueMinister, #अहमदनगर #शासकीय #वाळू #विक्रीकेंद्र #उद्घाटन #600रूपये #ब्रास #महाखनिज #ॲप #संकेतस्थळ #महसूलमंत्री #राधाकृष्णविखे-पाटील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बाजार समिती निवडणूक : प्रशांत परिचारक म्हणाले, साथ असेल तर नक्की 2024 ला गुलाल खेळू
Next Article राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठा धक्का : शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची केली घोषणा

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?