पॅराग्वे, 23 जून (हिं.स.) :
नीरज चोप्राने पॅरिसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या
डायमंड लीगमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. ज्युलियन वेबरला मागे टाकत त्याने
हे सुवर्णपदक पटकावलं होतं. आता नीरज चोप्राचं लक्ष्य हे टोकियो वर्ल्ड
चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान पटकावण्याचं आहे.
दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या नीरजने ८६.१६
मीटर भाला फेकत नंबर वनचं स्थान या स्पर्धेत काबीज केलं होतं. तर दोहामध्ये
झालेल्या डायमंड लीगमध्ये त्याने ९० मीटर भाला फेकत इतिहास रचला होता. पहिल्यांदाच
त्याने आपल्या कारकीर्दीमध्ये अशी कामगिरी केली होती.
डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर आता
नीरज चोप्राला आगामी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. यासाठी
त्याने जोरदार तयारीही सुरु केली आहे. ही स्पर्धा टोकियोमध्ये १३ सप्टेंबर ते २१
सप्टेंबरदरम्यान खेळवण्यात येणार आहे.