Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बांगलादेश आर्मीचा कॉरिडॉर सुरू करण्याच्या अंतरिम सरकारच्या प्रस्तावावर आक्षेप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

बांगलादेश आर्मीचा कॉरिडॉर सुरू करण्याच्या अंतरिम सरकारच्या प्रस्तावावर आक्षेप

admin
Last updated: 2025/05/27 at 5:54 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

ढाका, 27 मे  बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हे राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे समजते. देशातील राजकीय परिस्थिती आणि त्यात सुरू असलेल्या घडामोडी यामुळे युनूस चिंतेत आहेत. अशा वातावरणात आपल्याला उत्तम काम करता येईल का, याबाबत युनूस यांना शंका असल्याचे म्हटले जात आहे. अलीकडेच युनूस यांनी देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याचे म्हटले होते. यानंतर आता बांगलादेश आर्मीने युनूस यांच्या एका प्रस्तावावर जोरदार आक्षेप घेत इशारा दिला आहे.

ढाका येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लेफ्टनंट कर्नल शफीकुल इस्लाम यांनी म्यानमारच्या राखीन प्रांतात तथाकथित कॉरिडॉर सुरू करण्याच्या अंतरिम सरकारच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला आणि बांगलादेश आर्मी या प्रकरणात तडजोड करणार नाही असे सांगितले. कॉरिडॉर, राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी संबंधित मुद्द्यांवर आर्मी तडजोड करणार नाही. ५ ऑगस्ट २०२४ देशाच्या हितासाठी आर्मीने सर्वांशी समन्वय साधला आहे, असेही ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेत बोलताना ब्रिगेडियर जनरल नाझीम उद दौला म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य, सुरक्षा किंवा सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यावेळी पत्रकारांनी युनूस सरकार आणि आर्मीतील संघर्षाबाबत प्रश्न विचारले. यावर बोलताना, बांगलादेश आर्मी आणि मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. सर्वांना विनंती करतो की, त्यांनी परिस्थितीचा चुकीचा अर्थ काढू नये. सरकार आणि बांगलादेश आर्मीत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र काम करत आहोत. प्रत्येक पावलावर एकमेकांना पूरक आहोत, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, बांगलादेश आर्मी आणि सरकार एकाच कुटुंबाचे भाग आहेत. मात्र, ही फूट पडण्याची चिन्हे नाहीत. ते प्रक्रियेचा भाग आहे, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे बांगलादेशची आर्थिक व सामाजिक स्थिती दिवसेंदिवस खालावल्याचे म्हटले जात आहे. युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या धोरणांविरोधात सामान्य नागरिक व शासकीय कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी ढाक्याची स्थिती बिकट झाली आहे. ढाक्यात प्रामुख्याने आंदोलने होत असल्याने सरकारची चिंता वाढल्याचे सांगितले जात आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २,५८,८८७ विद्यार्थ्यांची नोंदणी
Next Article पाकिस्तानच्या विनंतीवर झाला युद्धविराम- एस. जयशंकर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?