Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: किरीट सोमय्यांच्या नावाने आक्षेपार्ह अर्धनग्न व्हिडिओ कॉल; चौकशीचे आदेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

किरीट सोमय्यांच्या नावाने आक्षेपार्ह अर्धनग्न व्हिडिओ कॉल; चौकशीचे आदेश

Surajya Digital
Last updated: 2023/07/18 at 7:11 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

मुंबई : एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील व्यक्ती भाजपचे नेते किरीट सोमय्या असल्याचा दावा केला जात आहे. ‘लोकशाही मराठी’ या वृत्त वाहिनीने हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. पण हा व्हिडिओ खरा आहे की खोटा याविषयी कोणतीही खातरजमा करण्यात आलेली नाही. Offensive semi-nude video call in the name of Kirit Somaiya; Opposition leader Ambadas Danve ordered the inquiry तर विद्या चव्हाण, सचिन सावंत, अतुल लोंढे, राजू शेट्टी, अंकुश काकडे यांनी याप्रकरणी चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी केली आहे.

माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ नुकताच लीक झाला आहे. बेडवर अर्धनग्न अवस्थेत महिलेसोबत त्यांनी व्हिडिओ कॉल केला. सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र किरीट सोमय्या यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला आहे. एकीकडे भाजप ईडी आणि सीबीआयसह विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत आहे, तर दुसरीकडे पक्षाच्या नेत्यांचे अश्लील व्हिडिओ समोर येत आहेत, असे नेटिझन्स म्हणत आहेत.

किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ कालपासून माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. यावर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी ‘ किरीट सोमय्या, राहील साहिलं आज करतो, पेनड्राईव्ह घेऊन येतोय, भेटूया सभागृहात ” असे म्हटले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत सोमय्या यांच्याबाबत एक पेन ड्राईव्ह सादर केला आहे. ‘जवळपास 8 तासांचे हे व्हिडिओ आहेत, एका महिलेने हिंमत करुन हे व्हिडिओ माझ्याकडे दिले आहेत, अनेक महिलांच्या मजबुरीचा फायदा घेण्यात आला आहे, या प्रकरणी चौकशी करावी,’ अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किरीट सोमय्यांच्या प्रकरणात चौकशी करण्याची घोषणा करत कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. विधानपरिषेदत आज विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप करत एक पेन ड्राईव्ह सादर केला. दरम्यान हे व्हिडिओ पाहणे कठीण परीक्षा आहे, महिलेची तक्रार आली पाहिजे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी म्हटले.

 

ये क्या है बे ! pic.twitter.com/325flz5jSi

— Umesh Warhade (@umeshw14) July 18, 2023

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. अंधारे म्हणाल्या की, “या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. माझ्याकडे सुद्धा अशा अनेक तक्रारी आल्या. या व्हिडिओमध्ये 100 टक्के सत्यता असणार. किरीट सोमय्यांचा भाजपाच बळी घेत आहे. भाजपानेच किरिट सोमय्यांना बळीचा बकरा बनवला आहे”. सोमय्यांची उपयोगिता संपली आहे. असे त्या म्हणाल्या.

याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली “आमच्यावर आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे, जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका.” नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे. जे जे होईल ते पाहत राहावे. जय महाराष्ट्र!” असे ते ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

यावर किरीट सोमय्या यांनी एक पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. तसेच त्यांना या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. महिलांवर अत्याचार केल्याचे माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, सगळ्या व्हिडिओ क्लिपची सत्यता तपासावी, चौकशी करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, व्हिडिओची सत्यता तपासून घ्यावी अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी लिहिलेलं पत्र – “आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे. ”

 

A video clip of me was shown on a news channel. Claimed that I have harrassed many women & many such video clips available & complaints received against Me

I have never abused any woman

Request @Dev_Fadnavis to investigate such allegations and verify the authenticity of Videos pic.twitter.com/rR0l4nalOz

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023

 

“मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार.. झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी अशी मी आपणास विनंती करीत आहे, कळावे.

You Might Also Like

हायस्पीड रेल्वेच्या भूसंपादनात गैरव्यवहार : आढळराव पाटील

पुणे विमानतळावरील १३ उड्डाणे रद्द

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा

TAGGED: #Offensive #semi #nudevideo #call #name #KiritSomaiya #Opposition #leader #AmbadasDanve #ordered #inquiry, #भाजपनेते #माजीखासदार #किरीटसोमय्या #नावाने #आक्षेपार्ह #अर्धनग्न #व्हिडिओ #कॉल #चौकशी #आदेश #अंबादासदानवे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दहा हजाराची लाच घेताना ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात ना हरकत
Next Article विरोधकांनी बनवला आपला ‘INDIA’; विरोधकांची पुढील बैठक मुंबईला होणार, 26 पक्षांची एकजूट

Latest News

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
देश - विदेश May 9, 2025
संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Top News May 9, 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
सोलापूर May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
सोलापूर May 9, 2025
सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
सोलापूर May 9, 2025
crime
पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
सोलापूर May 9, 2025
पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?