Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: MSEDCL news मुख्याध्यापकाच्या मृत्यूप्रकरणी महावितरणचे दोन अधिकारी निलंबित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

MSEDCL news मुख्याध्यापकाच्या मृत्यूप्रकरणी महावितरणचे दोन अधिकारी निलंबित

Surajya Digital
Last updated: 2022/06/04 at 1:42 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ महावितरणच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

सोलापूर / बार्शी : बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील विद्युत अपघाताला जबाबदार धरत बार्शी कार्यालयातील कनिष्ठ अभियंता महेश झिंगाडे आणि तंत्रज्ञ संभाजी दळवी या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. Two MSEDCL officials suspended in connection with the death of the headmaster

शेतकऱ्याने तक्रार करूनही वेळेत निवारण न केल्यामुळे कासारवाडी येथे शेतात तुटलेल्या तारेतील विजेच्या धक्क्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता महेश भगवान झिंगाडे, तंत्रज्ञ संभाजी शिवाजी दळवी यांना बार्शीचे विभागीय कार्यकारी अभियंता सुरेश कुऱ्हाडे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.

बार्शी येथील जनसेवा विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश गुंड आणि त्यांचे बंधू अड. प्रकाश गुंड हे गुरुवारी सकाळी शेतात गेले होते. त्यावेळी त्यांना शेतात तुटून पडलेल्या तारेचा स्पर्श होऊन विजेचा धक्का बसला. यात मख्याध्यापक सतीश गुंड यांचा जागीच मृत्यू झाला. तर ॲड. प्रकाश गुंड जखमी झाले.

□ महावितरणच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

बार्शी : तालुक्यातील कासारवाडी गावातील ऊस शेती मध्ये तुटून पडलेल्या विजेच्या तारांमधील विद्युत प्रवाहाचा धक्का लागून जनसेवा हायस्कूलचे मुख्याध्यापक सतिश शिवाजीराव गुंड ( वय 57) हे जागीच मयत झाले. तर त्यांचे ज्येष्ठ बंधू शेतकरी प्रकाश गुंड हे गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी 9 वाजता घडली.

 

मृत मुख्याध्यापक सतिश गुंड

 

घटनेच्या दोन दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या वादळ व पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले असून त्यावरील तारा तुटून जमिनीवर पडल्या आहेत. कासारवाडी येथील आपल्या शेतामध्ये सकाळी गुंड बंधू विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेले होते. तेंव्हा प्रथम प्रकाश गुंड तुटून पडलेल्या तारेमधील विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. त्यामुळे ते कोसळून खाली पडले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/554361082908292/

 

त्यांच्या अंगावर पडलेली तार आपल्या शर्टाने उचलून बाजूला करण्याच्या प्रयत्नात त्यांचे बंधू सतीश गुंड यांना त्या तारेचा गळ्याजवळ व छातीजवळ मोठा धक्का बसला. शेतातील कामगारांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

दरम्यान वादळवारे येवून दोन दिवस उलटूनही तालुक्यात अनेक ठिकाणी पडलेले वीजेचे खांब व तारा यांचा आढावा घेवून ठिकठिकाणी तुटलेल्या तारांमधील विद्युत प्रवाह खंडीत करणे, याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. याबाबत शेतकर्‍यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेश कुर्‍हाडे व कनिष्ठ अभियंता महेश झिंगाडे यांच्याकडे तक्रारी करुनही प्रशासन ढिम्म राहिले.

त्यामुळे गुंड  यांचा महावितरण अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेच हकनाक बळी गेला आहे. या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी उर्जामंत्री नितिन राऊत यांच्याकडे महाहौसिंगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी केली होती.

गुंड हे मिरगणे यांचे सख्खे मेहुणे आहेत. गुंड घराणे बार्शी तालुक्यातील नामांकित शिक्षणसंस्थाचालक प्रसिध्द आहेत. गुंड यांच्या मृत्यूमुळे कसबा परिसरात शोककळा पसरली आहे. गुंड यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक तपास सहा. पो. निरी. शिवाजी जायपत्रे करीत आहेत.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/554319739579093/

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Two #MSEDCL #officials #suspended #connection #death #headmaster #barshi #gund, #मुख्याध्यापक #गुंड #बार्शी #मृत्यूप्रकरणी #महावितरण #दोन #अधिकारी #निलंबित
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वाढदिवसाच्या कारणावरून सोलापुरात दगडफेक; पोलिस वेळेत आल्याने अनर्थ टळला
Next Article ऑक्सिजन टाकीचा स्फोट होवून पाच लाखांचे नुकसान, जीवितहानी नाही

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?