Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/02/20 at 6:10 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

वाशिम : वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील निम्बी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला. बालिकेला डोस दिल्यानंतर मेंदूचे काम करणे बंद झाले. त्यानंतर दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता उपचार दरम्यान बालिकेचा मृत्यू झाला. बालिकेला दिलेल्या लसीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप पालक केशव आडे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

वाशिममध्ये चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप बालिकेच्या पालकांनी केला आहे. मंगरूळपीर तालुक्यामधील निम्बी गावामध्ये 8 फेब्रुवारीला बालिकेला डोस दिल्यानंतर मेंदूचे काम करणे बंद झाले. त्यानंतर तात्काळ वाशिममधील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्या बालिकेचा मृत्यू झाला. डोक्यात ताप शिरल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. Two-month-old baby dies due to wrong polio dose

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

बालिकेला दिलेल्या लसीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप पालक केशव  आडे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. त्यांनी तशी तक्रार  मंगरूळपीर पोलिसात केली आहे. तसेच याबाबतची तक्रार आरोग्य आधिकरी यांच्याकडेही केली आहे. 8 फेब्रुवारीला बालिकेला  पोलिओ डोस दिला. त्यानंतर त्याच रात्री बालिकेचे मेंदूच काम करणे बंद झाले, असे तक्रारीत म्हटले आहे. मुलीला एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. अधिक उपचारासाठी अकोला इथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. उपचार दरम्यान  मृत्यू झाला.

याबाबत आरोग्य विभागाने बालिकेला दिलेल्या डोसबाबत आपले  स्पष्टीकरण दिले आहे.

याबाबत आरोग्य विभागाने बालिकेला दिलेल्या डोसबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे. शासनाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे लसीकरण करत आहोत. लसीकरण केल्यावर 24 तासात त्याचे परिणाम जाणवतात. मात्र तसे न होता दुसऱ्या दिवशी बालिकेची प्रकृती बिघडली आणि उपचारानंतर बालिका दगावली म्हणून दोष दिला जात आहे. परंतु लस दिल्याने असे काही झालेले नाही, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तिच्यासोबत इतर ही मुलांना हा डोस दिला. मात्र दुसऱ्या मुलांना काहीच इन्फेक्शन झाले नाही. त्यामुळं हा मृत्यू पोलिओचा डोस झाला नसावा असे जिल्हा साथरोग आणि माता बालसंगोपन अधिकारी डॉ मोबिन खान यांनी सांगितलं आहे.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #Two-month #oldbaby #dies #wrong #polio #dose, #चुकी #पोलिओ #डोस #दोनमहिना #बालिका #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ – भाऊ; सध्या मोठ्या परिवर्तनाची गरज – के. चंद्रशेखर राव
Next Article आयपीएल 15 वा हंगाम : 26 मार्चपासून सुरू होणार !

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?