नवी दिल्ली, 23 जून (हिं.स.)
अर्जुन
पुरस्कार विजेता ऑलिंपियन ललित उपाध्यायने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर
केली आहे. तो देशांतर्गत सामने खेळत राहणार आहे. ललित हा उत्तर प्रदेश पोलिसात
डेप्युटी एसपी आहे. सध्या तो बेल्जियममध्ये होणाऱ्या एफआयएच प्रो लीगच्या युरोपियन
टप्प्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
ललित
उपाध्यय म्हणाला की, तो हॉकीमध्ये खूप उंचीवर पोहोचला आहे. खेळाडूने त्याच्या
शिखरावर असताना भविष्यासाठी निर्णय घ्यावा. म्हणून आता मी आंतरराष्ट्रीय
सामन्यांपासून दूर राहून देशांतर्गत सामने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इतर
तरुण प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळतील.
ललित
हा टोकियो आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
तो बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचाही सदस्य
होता. ऑलिंपिकमध्ये खेळणारा तो वाराणसीचा चौथा हॉकी खेळाडू आहे. दोन ऑलिंपिकमध्ये
खेळणारा तो दुसरा खेळाडू आहे. ललित सेंटर फॉरवर्ड पोझिशनवरून खेळतो. त्याने
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० हून अधिक गोल केले आहेत.