Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लोकसभा अध्यक्षांच्या कन्येने पहिल्याच प्रयत्नात मिळवले आयएएसमध्ये यश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

लोकसभा अध्यक्षांच्या कन्येने पहिल्याच प्रयत्नात मिळवले आयएएसमध्ये यश

Surajya Digital
Last updated: 2021/01/06 at 5:14 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : लोकसेवा आयोगाच्या परीक्षा म्हणजे फक्त आणि फक्त हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांच्या यशाची गाथा असते. त्यामुळे, गरीब घराण्यातील मुलेही आयएएस अधिकारी झाल्याची कित्येक उदाहरणे आपण पाहिली आहेत. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कन्या अंजली बिर्ला यांनीही कष्ट आणि चिकाटीतून आयएएस पदाला गवसणी घातली आहे.

वडिल देशाच्या लोकसभेचे सभापती असतानाही लेकीनं वडिलांचं नाव अभिमानाने आणि गौरवाने मोठं केलंय. आपली मुलं आपल्यापेक्षा मोठी आणि कर्तृत्ववान व्हावीत, अशी सर्वच पालकांची इच्छा असते. मग, तो टपरीत चहा विकणार चहावाला असो किंवा देशाच्या सभापतीपदाची जबाबदारी सांभाळणारे ओम बिर्ला. त्यामुळेच, ओम बिर्ला यांच्या घरी सध्या उत्सवाचे वातावरण आहे. कारण, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अंजली ओम बिर्ला यांनी यश मिळवले आहे.

सोमवारी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. युपीएससी परीक्षांच्या निकालात अंजली यांचे नाव झळकताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सभापती ओम बिर्ला आणि त्यांची कन्या अंजली बिर्ला यांचं अभिनंदन केलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोटा येथील सोफिया महाविद्यालयात आर्ट शाखेतून अंजली यांनी आपले शिक्षण घेतले. त्यानंतर, दिल्लीतील रामजस महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयात ऑनर्स पदवी घेतली. त्यानंतर, दिल्लीतच त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले असून मोठी बहिणी आकांक्षा यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, आई डॉ. अमित बिर्ला आणि वडिल ओम बिर्ला यांनीही स्वत:वर विश्वास ठेवून तयारी करण्यास बळ दिल्याचेही अंजली यांनी म्हटलंय.

कोटा येथे शक्यतो बायोलॉजी आणि गणित या विषयांना प्राधान्य दिले जाते, त्यामुळे येथील विद्यार्थी याच विषयासाठी प्रवेश घेतात. मात्र, या दोन विषयांपलिकडेही खूप मोठे शिक्षण, समाज, जगदुनिया आहे. त्यामुळेच, परीक्षार्थींनीही हाही विचार करायला हवा, असेही अंजली यांनी सांगितलं. मी दररोज 10 ते 12 तास अभ्यास करत होते. परीक्षेसाठी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय हे दोन विषय निवडले होते. वडिल राजकीय नेते आहेत, तर आईही वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावते.

“आमच्या कुटुंबातील सर्वचजण वेगवेगळ्या क्षेत्रात समाजसेवेचं काम करतात. त्यातूनच मीही आयएएस अधिकारी बनून समाजसेवा करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार, प्रयत्न केले, मेहनत घेतली आणि त्याचं फळ मिळालं, भविष्यात महिला सक्षमीकरणासाठी काम करायला जास्त आवडेल”

– अंजली बिर्ला

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #लोकसभा #अध्यक्षांच्या #कन्येने #पहिल्याच #प्रयत्नात #मिळवले #आयएएसमध्ये #यश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article थकित एफआरपीमुळे सांगलीत साखर कारखान्याचे कार्यालय पेटवले
Next Article कंगनाने केले आता काँग्रेस नेते शशी थरुरांना लक्ष्य, महिलांना भत्ता द्या

Latest News

По какой причине индивидам приятно смотреть за ходом сторонним риском
Top News December 16, 2025
Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?