Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Teacher salary एक तारखेला होणार शिक्षकाचा पगार : एक बटन दाबले अन शिक्षकांचा 94 कोटी पगार झाला जमा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

Teacher salary एक तारखेला होणार शिक्षकाचा पगार : एक बटन दाबले अन शिक्षकांचा 94 कोटी पगार झाला जमा

Surajya Digital
Last updated: 2022/05/19 at 9:20 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

□ प्राथमिक  शिक्षकांना सीएमपी प्रणाली द्वारे पगार जमा

□ जिल्ह्यातील ९ हजार ४३३ समावेश

सोलापूर :  जिल्ह्यातील ९ हजार ४३३ प्राथमिक शिक्षकांना सीएमपी प्रणाली द्वारे  94 कोटी पगार एक बटन दाबल्यावर जमा झाला आहे. राज्यात शिक्षकांना वेळेत पगार देणारी सोलापूर जिल्हा परिषद अग्रणी असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.  On one day, the salary of a teacher will be paid at the push of a button and the salary of a teacher will be Rs 94 crore

Contents
□ प्राथमिक  शिक्षकांना सीएमपी प्रणाली द्वारे पगार जमा□ जिल्ह्यातील ९ हजार ४३३ समावेशस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ असा होणार पगार जमा□ सीएनपीमुळे सर्व तांत्रिक त्रुटी दूर 

जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात आज सीएनपी प्रणाली द्वारे प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख अशा एकूण 9 हजार 433 जणांचा पगार सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते एका क्लिक वर जमा करण्यात आला. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील,उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार, लेखाधिकारी रामचंद्र पाटील, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी प्रमुख उपस्थित होते.

प्रशासकीय व तांत्रिक त्रुटी दूर करून दरमहा १ तारखेला शिक्षक व केंद्र प्रमुख यांचे वेतन थेट जिल्हा स्तरावरून त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा होण्यासाठी अर्थ विभागाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार व चंद्रकांत सुर्वे व त्यांचे टीमने मेहनत घेतली.

महिन्द्रा कोटक बॅंकेची मदत घेऊन कमी कालावधीत युध्द पातळींवर हे काम पूर्ण केले. त्या बद्दल सिईओ दिलीप स्वामी यांनी टीम चे अभिनंदन केले. या प्रसंगी शिक्षक संघटनेचे वतीने सिईओ दिलीप स्वामी यांचा ही प्रणाली राबविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रणाली राबविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल सिईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, लेखाधिकारी रामचंद्र पाटील, महिन्द्रा कोटक बॅंकेचे शाखा व्यवस्थापक ओंकार देवळे , सहाय्यक लेखाधिकारी योगेश कटकधोंड, विलास मसलकर, दिपक शेडे, यांचा सत्कार करण्यात आला.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

शिक्षक संघटनेचे सुरेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. क्रांतीकारी निर्णय सिईओ दिलीप स्वामी यांनी घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. शिक्षक संघटनेचे म. ज. मोरे, एकनाथ भालेराव, राम इंगळे, महादेव जठार, विठ्ठलसिंग तोवर, शहानवाज मुल्ला, विवेक लिंगराज, सुरेश पवार यांनी सिईओ दिलीप स्वामी यांचे स्वागत केले.

 

□ असा होणार पगार जमा

गटशिक्षणाधिकारी मुख्याध्यापक यांच्याकडून आलेल्या वेतन देयकांचा पडताळणी करतील. गैरशासकीय कपाती वेगळे करतील. एकत्रित संकलित देयक जिल्हा स्तरावर पाठवतील. तालुका निहाय बॅंक खाते यादी व वेतन तरतूद मागणी व प्रमाणपत्र कपात विवरण पाठवतील. दर महिन्याचे २० तारखेला अहवाल व संचिका शिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीने तयार करतील.

२५ तारखे पर्यंत अर्थ विभागाकडे पाठवून त्याची पडताळणी करून दर महिन्याचे एक तारखेला निव्वळ पगार शिक्षकांचे खात्यावर जमा होईल. कपात रक्कम गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर सीएनपी प्रणाली द्वारे जमा होईल. सिईओ दिलीप स्वामी यांच्या पाठपुराव्यामुळे पगार वेळेत देणे शक्य झाले आहे. मी २० वर्षे शिक्षक होतो माझा पगार १ तारखेला मिळाला नाही मात्र इतरांचा पगार १ तारखेला करता येत आहे याचा आनंद होत असल्याचे शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार यांनी सांगितले.

□ सीएनपीमुळे सर्व तांत्रिक त्रुटी दूर 

सीएनपी प्रणालीमुळे सर्व तांत्रिक त्रुटी दूर झाले आहेत. या पुढे शिक्षकांना पगारीसाठी वाट पहावी लागणार नाही. सिईओ दिलीप स्वामी यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. टीम गेल्या एक महिन्यापासून या वर काम करत आहे. कोटक महिन्द्रा बॅंकेचे चांगले योगदान मिळाल्याचे मत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे यांनी सांगितले.

 

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #oneday #salary #teacher #paid #push #button #salary #Rs94crore, #solapur #zhill #parishad #zp, #एक #तारीख #शिक्षक #पगार #बटन #जिल्हापरिषद #94कोटी #पगार #जमा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Attempted murder अकलूजमध्ये जुन्या भांडणाच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न
Next Article Raj Thackeray Ayodhya tour राज ठाकरेंचा ‘तुर्तास अयोध्या दौरा स्थगित !’ रविवारच्या सभेत सविस्तर बोलणार

Latest News

नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
सांगलीच्या जयश्री पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेश
महाराष्ट्र June 18, 2025
पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
महाराष्ट्र June 18, 2025
काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील
Top News June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?