Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पॅरोलवर आलेल्या आरोपीने दुसऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पॅरोलवर आलेल्या आरोपीने दुसऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2023/01/28 at 3:14 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मोहोळ : जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या आणि पॅरोलवर आलेल्या आरोपीने दुसऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून खुनेश्वर येथील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. २७ जानेवारी) उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. The accused, who was on parole, committed suicide because of the trouble of his second wife

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 आंतरजिल्हा सराईत गुन्हेगाराकडुन जबरी चोरी, घरफोडीसह चार गुन्हे उघड

 

तिथून मिळालेल्या माहितीनुसार मृत वैभव कालिदास मगर (व ४१ रा .खुनेश्वर ता. मोहोळ ) याला पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेप शिक्षा लागली होती. तो येरवडा जेलमध्ये ही शिक्षा भोगत होता. १३ जानेवारी तो आपल्या गावी पॅरोलवर आला होता. मात्र पॅरोल रजेवर असल्यामुळे त्याला एक दिवसाआड तामलवाडी (ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद ) येथे पोलीस स्टेशन मध्ये हजेरी साठी जावे लागत होते.

 

२६ जानेवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास तो घरून हजेरी देण्यासाठी म्हणून कामाला गेला होता. सायंकाळी साडेआठ वाजता स्वतःची आई निर्मला हिला मोबाईल फोन करून जेवण बनवून ठेव, असे सांगितले होते. परंतु तो रात्री उशिरापर्यंत आला नाही म्हणून त्याचा नातेवाईकांकडे सर्वांनी शोध घेतला तथापि तो आढळून आला नाही २७ जानेवारी रोजी सकाळी आठच्या दरम्यान मृताची मामी सौ. शैला या शेतातील देवाच्या पूजा करण्यासाठी गेल्या असता गट नंबर २८१ मध्ये असलेला चिंचेच्या झाडाला वैभव याने नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर आपले पती भिकाजी सोपान चव्हाण यांना याची माहिती दिली आणि या सर्वांनी जाऊन खात्री केल्यानंतर मृत वैभव कालिदास मगर हाच असल्याचे आढळले. त्यानुसार त्यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली.

 

पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या मृताच्या कपड्याच्या तपासणीमध्ये एक चिठ्ठी आढळली आणि त्यामध्ये माझ्या मरणास माझी दुसरी पत्नी डॉक्टर प्रियंका सुरेश मोटे (रा .नरखेड) उर्फ प्रियांका वैभव मगर हीच जबाबदार असल्याचे आणि तिच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहे, असे लिहिल्याचे आढळले आहे.

 

याची खबर मृताचा मामा भिकाजी सोपान चव्हाण यांनी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 आंतरजिल्हा सराईत गुन्हेगाराकडुन जबरी चोरी, घरफोडीसह चार गुन्हे उघड

 

सोलापूर  –  शहरात चोरी, घरफोडी,जबरी चोरी, चाकू दाखवून लुटमार करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक करून चार गुन्हे उघड केले.हरजितसिंग टाक ( वय 45, रा. सध्या लातूर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

शहर परिसरात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे घडत असताना शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास सुरू केला असता त्यामध्ये हरजितसिंग टाक याने काही गुन्हे केल्याचे उघड झाले त्याला अटक करून त्याच्याकडून जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन जबरी चोरीचे, एमआयडीसी आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक चोरीचे गुन्हे त्याने त्याच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचे कबुल केले.

चोरीतील दोन मोटारसायकली व सोन्याच्या दागिन्यासह 2 लाखाचा ऐवज पोलीसांनी जप्त केला. ही कामगिरी शहर गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, प्रकाश गायकवाड, कृष्णात कोळी, राजु मुदगल, महेश शिंदे, कुमार शेळके, सिध्दाराम देशमुख, वसिम शेख, सतीश काटे यांनी पार पाडली.

 

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #accused #parole #committed #suicide #because #trouble #second #wife #solapur #mohol, #पॅरोल #आरोपी #दुसऱ्या #पत्नी #त्रास #कंटाळून #आत्महत्या #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर | श्री विठ्ठल – रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न
Next Article आमदार संतोष बांगरांसह 30 – 40 जणांवर गुन्हा दाखल

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?