Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एक वर्ष लोक कसे जगले हे ‘मातोश्री’मध्ये राहून समजणार नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

एक वर्ष लोक कसे जगले हे ‘मातोश्री’मध्ये राहून समजणार नाही

Surajya Digital
Last updated: 2021/03/30 at 11:44 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : आपल्या राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारकडून पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे संकेत आहेत. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या लॉकडाऊनला विरोध दर्शवला असून राज्य सरकारने हातावर पोट असलेल्या साधारण एक कोटी नागरिकांना प्रत्येकी पाच हजार द्यावेत व नंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.

एक वर्ष लोक कसे जगले हे ‘मातोश्री’मध्ये राहून समजणार नाही, असा टोमणा चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मारला. ते म्हणालेत, “पूर्वी राजा वेश बदलून वस्त्यांमध्ये फिरायचा तसे फिरावे लागेल. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून फिरला की तुमच्यासोबत ताफा असेल. त्यामुळे लोक तुमच्याशी मनमोकळं बोलणार नाहीत.

राज्यामध्ये रात्री ८ ते सकाळी ७ जमावबंदीचे आदेश लागू करण्यावरूनही पाटील यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंना टोमणा मारला. “आता नाईट कर्फ्यू लागू केला. ते आम्हाला मान्य आहे. रात्री कोणाला फिरायचे असते? ज्यांना फिरायचे असते ते तुमच्यासोबत असतात. त्यांना नाईट लाईफ हवे असते. सर्वसामान्यांना नाईट लाईफ नको, त्यांना सातच्या आत घरात चालते.

* लॉकडाऊनबाबत भाजप, राष्ट्रवादीची भूमिका

– भाजपची भूमिका – मातोश्रीवर बसून सर्वसामान्यांचा त्रास कसा कळणार. राज्य सरकार जनतेला एक रुपयाचाही दिलासा न देता, लॉकडाऊन लावणार असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही.

– राष्ट्रवादीची भूमिका – लॉकडाऊन हा पर्याय राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा, अशी आग्रही भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Onecannot #understand #lived #Matoshri #forayear, #एकवर्ष #लोककसेजगले #मातोश्रीमध्ये #राहून #समजणारनाही
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धक्कादायक – कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट, 68,020 रुग्ण आढळले, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
Next Article फडणवीसांनी उमेदवार देणार नाही म्हटले होते, तरीही ३ तारखेपर्यंत वाट पाहू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?