Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे

admin
Last updated: 2025/06/12 at 6:56 PM
admin
Share
4 Min Read
SHARE

नाशिक, 12 जून (हिं.स.)।

– गेल्या ११ वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची सार्वभौम प्रगती झाली असून, सबका साथ सबका विकास हे सत्यात उतरले आहे. देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी देशात एक देश एक निवडणूक विकासाची गंगोत्री ठरेल तसेच सध्याचे केंद्र सरकार देशाचा गौरव आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रभारी राज्यसभा सदस्य डॉ अजित गोपछडे यांनी केले.दिनांक १० जून २०२५ रोजी भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक आणि भव्य मेळावा नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती त्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मा खा डॉ गोपछडे उपस्थित होते. कोविड काळा पासून भारताची विकास यात्रा अधिक वेगात सुरू असून जागतिक अर्थ व्यवस्थेत तिसऱ्या स्थानावर देश येऊन ठेपला असून लवकरच भारत महासत्ता म्हणून जगात विकसित देश म्हणून सिद्ध होणार आहे. पण ही सिद्धता नभूतो न भविष्यती सिद्ध करण्यासाठी कृषी प्रधान आपल्या देशात एक देश एक निवडणूक सर्व मान्य होणे फक्त गरजेचे नसून ते प्रत्यक्षात उतरवणे गरजेचे आहे. एक देश एक निवडणूक राजकीय फायद्यासाठी नसून तो विकसित राष्ट्राच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्या करता प्रत्येकाने विशेष प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

देशाला महासत्ता बनवण्यासाठी एक देश एक निवडणूक हा अत्यंत महत्वाचा विषय असून याची अंमलबजावणी झाल्यावर देशाच्या विकास यात्रेला अधिक गती प्राप्त होणार आहे. या विषयाचे जनमानसात महत्व पटवून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीआगामी काळात विविध उपक्रम राबण्याचा संकल्प आहे यात वैद्यकीय आघाडी तसेच वैद्यकीय आघाडी युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात जनप्रबोधन करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक देश एक निवडणूक हा जनतेच्या विकास कार्यातील एक महत्वाचा भाग असून या विषयामुळे देशाची आर्थिक स्थिती प्रबळ होणार आहे या करता प्रत्येक कार्यकर्त्यांनी समर्पित होणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

संकल्पातून सिद्धी या केंद्र सरकाच्या ११ वर्ष पूर्ती निमित्य ही बैठक आयोजित करण्यात आली असून वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय व्यवसायिकांचे मोलाचे योगदान या विकास यात्रेत महत्वाचे आहे ते अखंड पणे सुरू ठेवणे हे वैद्यकीय आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आद्य कर्तव्य आहे या पासून कोणीही परावृत्त होणार नाही असा विश्वास डॉ गोपछडे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

भाजपा वैद्यकीय आघाडी म्हणजे जनता आणि सरकार यांच्या मधील महत्वपूर्ण दुवा असून जनतेची नाळ पक्षा बरोबर वैद्यकीय आघाडी बरोबर अतिशय घट्ट जोडली गेलेली आहे हे सत्य समोर ठेऊन आगामी काळात वैद्यकीय आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या विकास कामा बरोबर त्यांचे प्रश्न सोडवण्याचा संकल्प करायला हवा यातून जनता जनार्दनाची सेवा होणार आहे या करता कटिबद्ध व्हा असे आवाहन त्यांनी केले.

सदर बैठकीत प्रदेश सह संयोजक नाशिक मधील प्रसिद्ध लाप्रोस्कोपी तज्ञ डॉ उमेश मराठे यांनी डॉ गोपछडे यांचा तर नाशिक महानगर जिल्हा संयोजक डॉ भालचंद्र ठाकरे यांनी भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ बाळासाहेब हरपले यांचा नाशिकवासीयांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.

डॉ गोपछडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपा वैद्यकीय आघाडी आगामी काळात समाजात जाऊन कार्य विस्तार करण्या बरोबर आगामी निवणुका आणि धर्मतेजाचे प्रतीक महाकुंभ मेळाव्यात दैदिप्यमान कार्य करेल, असा विश्वास प्रदेश अध्यक्ष डॉ बाळासाहेब हरपले यांनी व्यक्त केला. या बैठकीला प्रदेश स्तरावरील १५० पेक्षा अधिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं
Next Article एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?