Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, एक जखमी तर एकाचा दुर्दैवी मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, एक जखमी तर एकाचा दुर्दैवी मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2023/02/09 at 9:23 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 पैशाच्या बदल्याथ कर्जदारासोबत संबंध ठेवण्याचा तगादा, पतीसह सात जणांवर गुन्हा

सांगोला : शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. ही पोलिसांची गाडी होती. यात एका बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील कोणालाही दुखापत झाली नाही. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथील एका कार्यक्रमात हजेरी लावून शहाजीबापू परत जात असताना सांगोला तालुक्यातील माळवाडी- नाझरा येथे ही दुर्घटना घडली.  MLA Shahajibapu Patil’s convoy car met with an accident, one injured and one died unfortunately Sangola Solapur

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या स्कार्पिओ गाडी (क्रमांक एमएच १३, डी एम ९४४०) ला मोटरसायकल (क्रमांक एमएच ४५ ए जे ६३३० ) चा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार अशोक नाना वाघमारे (वय ५० वर्षे रा. माडगुळे ता. आटपाटी जि. सांगली) हा जागीच ठार झाला आहे. नानासाहेब बिरा आमुने (वय ४० वर्षे रा. एखतपुर ता. सांगोला. जि.सोलापूर) हा गंभीर जखमी झाला असून प्रकृती चिंताजनक आहे.

आमदार पाटील यांच्या ताफ्यातील कोणालाही दुखापत झालेली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की , काय झाडी काय डोंगर काय हाटील फेम आमदार शहाजीबापू पाटील हे नाझरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरासाठी गेले होते. शिबिराचा कार्यक्रम आटोपून ते सांगोल्याकडे येत होते. त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलिसांची संरक्षक गाडी होती नाझरा ते नाझरामठ या रस्त्यावर बोराटे वाडी येथे आज गुरूवारी ( ९ फेब्रुवारी) रोजी साडेचारच्या सुमारास मयत अशोक वाघमारे व नानासो आमुने हे मोटर सायकल वरून माडगुळे कडे चालले होते.

आमदार पाटील यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडीला मोटर सायकल धडकली. अपघात एवढा भयंकर होता की, दुचाकीने पोलिसांच्या गाडीला समोरून जोराची धडक दिल्याने एकाचा तडफडून मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांनी भेट दिल्याची माहिती आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 पैशाच्या बदल्याथ कर्जदारासोबत संबंध ठेवण्याचा तगादा, पतीसह सात जणांवर गुन्हा

 

○ गर्भवती विवाहितेस लाथाने मारहाण; बाळ दगावले

सोलापूर – हुंड्याच्या कारणावरून २७ वर्षीय गर्भवती विवाहितेला लाथाबुक्याने मारहाण केल्याने पोटातच बाळ मयत झाले. त्यानंतर विवाहीतेच्या संमती विना गर्भपात केल्याची घटना करमाळा शहरातील शिवाजीनगर येथे नुकतीच उघडकीस आली.

 

पैशाच्या बदल्यात कर्जदारासोबत संबंध ठेवण्यास सांगितले. मात्र, त्याला विरोध केला, म्हणून २९ वर्षांच्या विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी पती व सासूसह करमाळा पोलिसात सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणात करमाळ्याच्या पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह ७ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती, सासू,सासरे, दीर, चुलत सासरेसह आणखी एक ( सर्व रा. करमाळा) अशा सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घरावर जप्ती केली जाईल, घर खाली करावे लागेल, घर वाचवायचे असेल, तर कर्जाचे पैसे द्यायचे नसतील, तर मी म्हणेन ते ऐकावे लागेल,’ असे म्हणत होता. पती, सासू पैशाच्या बदल्यात कर्जदारासोबत संबंध ठेवण्यास सांगत होते. पीडित महिला त्यांच्या या प्रकारास विरोध केला. तेव्हा पती व सासू यांनी रात्रभर काठीने मारले. तू जर माहेरी काही सांगितलेस, तर तुझ्या एकुलत्या एक मुलाचा खून करीन, अशी धमकीही दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

बारामती येथे राहणाऱ्या पीडितेचा विवाह २०१८ साली करमाळ्यातील युवकासोबत रीतीरीवाजाप्रमाणे झाला होता. तीन महिने व्यवस्थित नांदल्यानंतर ती गर्भवती झाली. त्यानंतर तिचा सासरी छळ करण्यात सुरुवात झाली. बारामती येथे ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तिचा पती आणि सासू सासरे यांनी तिच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतले होते. त्यानंतर तिला मुलगा झाला. करमाळा येथे पुन्हा नांदण्यास गेल्यानंतर वरील आरोपी तिचा जाच करून छळ करण्यास सुरुवात केली. आणि तिला माहेरून ७ लाख रुपये आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिच्या वडिलांनी फ्लॅट घेण्यासाठी ७ लाख रुपये दिले होते. तिच्या अंगावरील सोने आणि वडीलांनी दिलेले पैसे घेऊन त्यांनी फ्लॅट घेतला.

व्यसनाधीन असलेला तिचा पती तिला नेहमीच मारहाण करीत होता. २०२१ साली तिला पुन्हा दिवस गेले होते. पती हर्षराज हा तिला दारूच्या नशेत हे बाळ ठेवायचे नाही असे म्हणत तिच्या पोटावर लाथा मारल्याने बाळ पोटातच मयत झाले होते. त्यानंतर घरातील लोकांनी करमाळा येथील एका रुग्णालयात तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करून बारामती येथे आणून सोडले होते.

 

आठवड्यानंतर श्रद्धा ही करमाळा येथे नांदण्यास आली. त्यावेळी व्यवसायात झालेले कर्ज फेडण्यासाठी आणखी १० लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे आणले नाही तरकर्ज मिळवून देणाऱ्या सोबत संबंध ठेव असे सांगितले होते. तिने नकार दिला असता पती सासू आणि सासऱ्याने तिला रात्रभर काठीने बेदम मारहाण केली. आणि हे प्रकरण माहेरी सांगितली तर तुझ्या एकुलत्या मुलाचा खून करेन अशी त्यांनी धमकी दिली. असे विवाहितेने फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.

 

 

You Might Also Like

सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात

सोलापूर विद्यापीठाची परीक्षा १४ ऑक्टोबरपासून!

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

सोलापूरमधील व्यापार्‍याची दोन लाख 23 हजारांची ऑनलाईन फसवणूक

सोलापूर – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सीओईपीतील नव्या इमारतीचे उद्घाटन

TAGGED: #MLA #ShahajibapuPatil's #convoy #car #met #accident #oneinjured #onedied #unfortunately #Sangola #Solapur, #सांगोला #सोलापूर #आमदार #शहाजीबापूपाटील #ताफा #गाडी #अपघात #एकजखमी #एक #दुर्दैवी #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डफरिन हॉस्पीटलमध्ये 24 तास सेवा आणि दररोज सुमारे 50 प्रसूतीची राहणार सोय
Next Article Solapur टेंभुर्णीत उद्या जंगी कुस्त्यांचे आयोजन; पंधरा वर्षांनंतर निकाली कुस्त्याचा भरणार आखाडा

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?