Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री तुळजाभवानी मंदिराचे रूप पालटणार, एक हजार कोटींचे दान पदरात पडणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

श्री तुळजाभवानी मंदिराचे रूप पालटणार, एक हजार कोटींचे दान पदरात पडणार

Surajya Digital
Last updated: 2023/03/23 at 3:45 PM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

● पंतप्रधान मोदींनी शब्द पाळला, विकासाचा मार्ग मोकळा

 

Contents
● पंतप्रधान मोदींनी शब्द पाळला, विकासाचा मार्ग मोकळास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● कसा असेल विकास आराखडा ?● छत्रपतींचेही दर्शन घडणार○ देर है, लेकिन अंधेर नही○ काय आहे प्रसाद योजना ?》 महसूल प्रशासन | सोलापुरातील 14 जणांची नायब तहसीलदारपदी बढती

सोलापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या मंदिराचे रूप पालटणार आहे. केंद्र सरकारने एक हजार कोटींचा विकास आराखडा तयार केला असून तिरूपती आणि शिर्डीच्या धर्तीवर तुळजापूरला येणाऱ्या भाविकांना साऱ्या सुविधा प्राप्त होणार आहेत. Shree Tuljabhavani temple will change form, donation of one thousand crores will fall under Tuljapur Narendra Modi’s word ऐतिहासिक वारसा असलेल्या तुळजापूर शहराच्या परिसरातील संपूर्ण भागाचा विकास केला जाणार असून या विकास आराखड्यातून धार्मिक पर्यटनाला मोठी चालना दिली जाणार आहे.

 

केवळ महाराष्ट्रच नव्हेतर तर अन्य राज्यांमधूनही श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी असंख्य भाविक दररोज येत असतात. लग्न सराईत तर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. ही गर्दी पाहाता सुलभ दर्शनाची म्हणावी तशी सोय नाही. इतर सोयींचाही अभाव आहे. त्याचा विचार करून केंद्र सरकारने प्रसाद या विशेष योजनेतून हा विकास आराखडा तयार केला आहे.

 

या आराखड्यात तुळजापुरात येणाऱ्या प्रत्येक प्रमुख मार्गावर शहराबाहेर म्हणजे नळदुर्ग रोड, हुडको, आराधवाडी भागात पार्किंग सुविधा असेल. सध्याच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येतील. त्याचठिकाणी भाविकांचे साहित्य ठेवण्याची सोय करण्यात येणार आहे. दर्शन अधिक सुलभ करण्यासाठी तसेच भाविकांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी शिर्डी, तिरूपती देवस्थानच्या धर्तीवर बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांचा वेळ वाचेल आणि गर्दीचेही नियंत्रण होईल.

 

नव्या योजनेमुळे दर्शनासाठी आपला नंबर कधी येणार हे भक्तांना आधीच कळणार आहे. त्यासाठी वाहन पार्किंग परिसरातच काऊंटर पास दिले जातील. त्यावरील वेळेनुसार तासभर आधी मंदिर आवारात भाविकांना प्रवेश मिळेल. दर्शन लाईन प्रकल्पातून टप्प्याटप्याने भाविकांना थेट मंदिरात सोडले जाणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● कसा असेल विकास आराखडा ?

 

नव्या आराखड्यात वातानुकुलित सभागृहातून दर्शनाची रांग असणार आहे. एकूण १० वातानुकुलित सभागृह आहेत. या सभागृहांची क्षमता ही एक लाख भाविक इतकी असेल. एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात पाठवून भाविकांना टप्प्याटप्प्याने मंदिरात सोडले जाईल. दर्शनाला किती वेळ लागेल हे आधीच कळणार आहे. वाहन पार्किंगच्या ठिकाणीच काऊंटर पास मिळेल. भाविकांना मंदिर परिसरात तासभर आधी प्रवेश मिळेल. मंदिर परिसरातील बांधकामात बदल होणार आहेत.

 

● छत्रपतींचेही दर्शन घडणार

 

तुळजापूर शहरालगत रामदरा परिसरात उद्यान साकारले जाणार आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक प्रमुख मार्गावर आता दगडी कमानी उभारण्यात येतील. शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता आल्यानंतर गरजेनुसार बदल केले जातील. यापूर्वी ३२५ कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविण्यात आला होता. यातून तुळजापूर शहराचा पुरेसा विकास झाला नाही.

 

○ देर है, लेकिन अंधेर नही

 

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजाभवानी मातेच्या शक्तीपीठाला विकासाची प्रतीक्षा आहे. अलीकडच्या काळात मंदिरात वाढलेली गर्दी आणि कमी पडत असलेल्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा राबविण्याची गरज व्यक्त झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये तुळजापुरात झालेल्या प्रचारसभेत मंदिराच्या विकासाची ग्वाही दिली होती. त्यानंतर नऊ वर्षांनी यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत. भगवान की घर देर है, लेकिन अंधेर नाही, अशी एक म्हण आहे. मोदींनी शब्द दिला होता परंतु उशीरा का होईना त्याची पूर्तता केल्यामुळे भाविकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

○ काय आहे प्रसाद योजना ?

 

केंद्र सरकारची ही योजना पर्यटन विभाग राबवत असते. भारतातील धार्मिक पर्यटनाच्या विकासासाठी आणि प्रोत्साहनासाठी मार्ग प्रशस्त करणे आहे, हा या योजनेमागचा उद्देश आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत २०१४-२०१५ मध्ये तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन ड्राइव्ह योजना सुरू केली होती.

‘तीर्थक्षेत्र कायाकल्प आणि आध्यात्मिक संवर्धन ड्राइव्ह’ हे प्रसाद उपक्रमाचे पूर्ण नाव आहे. हा कार्यक्रम धार्मिक पर्यटन वाढविण्यासाठी भारतातील तीर्थक्षेत्रे तयार करणे आणि ओळखणे यावर लक्ष केंद्रित केले जाते. तीर्थक्षेत्रांना प्राधान्याने संघटित आणि शाश्वत पद्धतीने एकत्रित करून सर्वांगीण धार्मिक पर्यटन अनुभव देणे हे या योजनेचे ध्येय आहे.

 

》 महसूल प्रशासन | सोलापुरातील 14 जणांची नायब तहसीलदारपदी बढती

 

□ 11 अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकार्‍यांचा समावेश

सोलापूर : पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अव्वल कारकून आणि मंडलाधिकार्‍यांना नायब तहसीलदारपदी बढती देण्यात आली असून यात सोलापुरातील 11 अव्वल कारकून आणि तिघा मंडलाधिकार्‍यांचा समावेश आहे.

बढती मिळालेले अव्वल कारकून पुढीलप्रमाणे. कंसात नियुक्तीचे ठिकाण. जयश्री चन्नप्पा पंचे-बीडकर (नायब तहसीलदार रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर), गजानन बेले (महसूल नायब तहसीलदार, सांगोला), सुधाकर बंडगर (निवडणूक नायब तहसीलदार, उत्तर सोलापूर), संतोष आढारी (निवडणूक नायब तहसीलदार, भूदरगड, कोल्हापूर), प्रवीण सूळ (नायब तहसीलदार, संगायो, इंदापूर, पुणे), प्रकाश सगर (नायब तहसीलदार, प्रांत कार्यालय, मंगळवेढा), सुभाष कांबळे (नायब तहसीलदार, प्रांत कार्यालय माण, सातारा), चंद्रकांत हेडगिरे (निवासी नायब तहसीलदार, मंगळवेढा), प्रकाश मुसळे (महसूल नायब तहसीलदार, शिरुर, पुणे), संजय भंडारे (महसूल नायब तहसीलदार, अक्कलकोट), सुबोध विध्वंस (निवडणूक नायब तहसीलदार, मोहोळ),

बढती मिळालेले मंडलाधिकारी पुढीलप्रमाणे. कंसात नियुक्तीचे ठिकाण

नानासाहेब कोळी (निवासी नायब तहसीलदार, जत, सांगली), बाबासाहेब गायकवाड, (निवडणूक नायब तहसीलदार, राधानगरी, कोल्हापूर), पांडुरंग भडकवाड, (महसूल नायब तहसीलदार, माढा).

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

TAGGED: #ShreeTuljabhavani #temple #change #donation #onethousandcrores #fall #Tuljapur #NarendraModi's #word, #तुळजापूर #श्रीतुळजाभवानी #मंदिर #रूप #पालटणार #एकहजारकोटी #दान #पदरात #पडणार #नरेंद्रमोदी #शब्दपाळला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article क्रीडाधिकारी सत्तेन जाधव यांना पाच लाखाचा दंड; दंड भरण्यासाठी दिली पंधरा दिवसांची मुदत
Next Article काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाचा तुरुंगवास, लगेच जामीन पण खासदारकी धोक्यात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?