Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर तालुक्यात 16 गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपूर तालुक्यात 16 गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’

Surajya Digital
Last updated: 2022/08/31 at 10:18 AM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
□ पर्यावरण पूरक सजावटीसाठी पंढरपूर नगरपालिका देणार बक्षिसस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)■ आज गणपती बाप्पाचे आगमन, वाचा शुभमुहूर्त□ तयारीला लागा – शिंदे सरकारची मोठी घोषणा

□ पर्यावरण पूरक सजावटीसाठी पंढरपूर नगरपालिका देणार बक्षिस

पंढरपूर : पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरे करणाऱ्या 3 गणेश मंडळांना पंढरपूर नगरपालिकेकडून रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंढरपूर शहरात अद्याप पर्यंत 89 मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्यातील 84 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. ‘One Village One Ganapati’ eco-friendly Bakshis Municipality in 16 villages in Pandharpur Taluka

 

पंढरपूर शहर व तालुक्यातील गावात गणेश उत्सव साजरी करताना समाजहीत लक्षात घेणे गरजेचे आहे. मंडळांनी रस्ता खोदला तर त्यांना दंड होईल. असे संकेत प्रांत अधिकारी गजानन गुरव यांनी गणेश उत्सव साजरी करणाऱ्या मंडळांना दिले आहेत.

गणेश उत्सव साजरी करताना कोणत्या सुचनांचे पालन कराव्यात, व प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी प्रांत अधिकारी गजानन गुरव यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसलिदार सुशिलकुमार बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

पुढे गुरव म्हणाले, उत्सव काळात रस्त्यावर मंडप टाकताना रस्ता खोदल्यास संबंधीत मंडळांना दंड आकारला जाईल. त्याचबरोबर मंडळांनी वीज मंडळाकडे रितसर अर्ज करुन लाईटेचे कनेक्शन घ्यावे.  शहरातील नागरिकांची गणेश मुर्ती विसर्जनाची सोय व्हावी, यासाठी विविध ११ ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र तयार करण्यात येत आहेत.

त्याचबरोबर नदीपात्रात देखील काही ठिकाणी मूर्ती विर्सजित करता येणार तसेच निर्मल संकलन केंद्रावरच नागरीकांनी निर्माल्य आणून द्यावेत. निर्मल संकलन करून रोग्यरीत्या कंपोस्ट केले जाईल, असे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.

पंढरपूर विभागात 385 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. तर 16 गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

 

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून गणेश मंडळे, मुर्तीकार आदींच्या वेळोवेळी बैठका घेत समाजात अशांतता निर्माण होईल, असे देखावे सादर करु नयेत. तसेच फ्लेक्स, बोर्ड आक्षेपार्ह लावू नयेत. अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी लोकांची यादी बनवण्यात आली आहे.

 

त्यानुसार त्यांच्यावर तात्पुरती हद्दपारी, स्थानबद्दता करण्यात येत आहे. यामध्ये 279 जणांना तात्पुरते स्थानबध्द करण्यात आले आहे. तर तर दोन पेक्षा अधिक गुन्हे असलेले दारु विक्रेते आदीं दोनशेहून अधिक जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तर 17 जणांना सीआरपीसी 92 नुसार कारवाई करण्यात आलेली आहे. तर कलम 144 नुसार 170 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

तसेच गणेश मंडळांना डॉल्बीचा आवाज 75 डिसीबलपेक्षा जास्त सोडू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. गणेशोत्सव काळात 100 पेक्षा जास्त स्वयंसेवकांची मदत घेण्यात येत आहे. त्ययाचबरोबर शहरातील 3 तर ग्रामीण भागातील 5 सार्वजिनक मंहळांना बक्षिस देण्यात येणार असल्याचेही विक्रम कदम यांनी सांगितले.

 

“गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टिने पोलीस विभाग व नगरपरिषद तसेच महसूल प्रशासन सज्ज आहे. पर्यावरण पुरक गणेशोत्सव संकल्पा राबवण्यात येत आहे. याच अनुषंगाने केंद्र सरकारचा महत्वपुर्ण यिषयअसलेला मतदान कार्डासोबत आधारकार्ड लिंक करणेची मोहिम राबवण्यात येत आहे. याचा प्रचार व प्रसार गणेश मंडळांनी करुन नागरिकांनी जनजागृती करावी”

– गजानन गुरव, प्रांताधिकारी

 

 

■ आज गणपती बाप्पाचे आगमन, वाचा शुभमुहूर्त

आज घराघरात गणरायांचे आगमन होणार आहे. आजच्या दिवशी शुभ मुहूर्त काय आहे? गणपती कधी स्थापन करायचा? पूजा विधी नेमकी काय आहे? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेत. जे लोक आपल्या घरगुती पूजा पाठविधी करून गणेशाची स्थापना करणार आहेत त्यांच्यासाठी स्थापनेचा मुहूर्त आणि पूजा विधी पुढीलप्रमाणे :

#मोरया #गणपती
#surajyadigital #सुराज्यडिजिटल #bappamorya #bappa
1) सकाळी 06 वाजून 25 मिनिटे ते 07 वाजून 59 मिनिटापर्यंत

2) सकाळी 07 वाजून 59 मिनिटे ते 09 वाजून 33 मिनिटापर्यंत

3) सकाळी 11 वाजून 07 मिनिटे ते 12 वाजून 41 मिनिटे #गणपतीबप्पामोरया
#शुभमुहूर्त #गणेश #गणेशचतुर्थी

पहिले दोन मुहूर्त अतिशय शुभ आहेत. मात्र, ज्या लोकांना इतक्या सकाळी गणपती स्थापन करता येणार नाही त्यांनी तिसऱ्या मुहूर्तावर गणपती स्थापन केला तरी चालेल.

 

□ तयारीला लागा – शिंदे सरकारची मोठी घोषणा

 

सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये राज्यात जम्बो मेगाभरती होणार आहे.  तब्बल 78000 पदांची भरती होणार आहे. गृहविभागातील 7 हजार पदांवरही 15 सप्टेंबरपासून भरती सुरु होणार आहे. पोलीस पदभरती 7231, एमपीएससीमार्फत भरती 11,026, गट ‘ब, – क व ड’ची पदभरती 60,000 होणार आहे. या भरतीला 15 सप्टेंबरनंतर सुरुवात होणार आहे. तर डिसेंबरनंतर 25 ते 50 हजार पदभरतीचा दुसरा टप्पा होणार आहे.

You Might Also Like

सोलापूर : टुर्स बुकिंगच्या आमिषातून ३१ लाखांची फसवणूक

जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन

डॉ. वळसंगकर आत्महत्या : डॉ. शोनाली, डॉ. जोशींच्या सहीचे निवेदन व्हायरल

सोलापूर मनपा, नऊ नगर परिषदा, 11 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

यशवंत पंचायत राजमध्ये सोलापूर जिल्हा परिषद तृतीय

TAGGED: #OneVillageOneGanapati #eco-friendly #Bakshis #Municipality #villages #Pandharpur #Taluka, #पंढरपूर #तालुका #गावांमध्ये #एकगावएकगणपती #पर्यावरणपूरक #बक्षिस #नगरपालिका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदार सचिन कल्याणशेट्टी सोलापूर भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष
Next Article गणपतीच्या आगमनादिनी सोलापुरात मश्रूम गणपती मंदिराचा 14 लाखाचा सोन्याचा कळस चोरीला

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?