Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सहकार शिरोमणीची निवडणुकीत कल्याणराव काळे यांच्यासमोर स्वकीयांसह विरोधकांचे आव्हान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

सहकार शिरोमणीची निवडणुकीत कल्याणराव काळे यांच्यासमोर स्वकीयांसह विरोधकांचे आव्हान

Surajya Digital
Last updated: 2023/05/22 at 4:17 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पंढरपूर : सूरज सरवदे

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे स्थापनेपासून कल्याणराव काळे यांचे वर्चस्व कारखान्यावर अबाधित राहिले आहे. गेली 23 वर्ष कल्याणराव काळे कारखान्याचे चेअरमन आहेत. मात्र पहिल्यांदाच कारखान्याची निवडणुकीत चुरस पाहायला मिळत आहे. परिवार, नातेवाईक आणि विरोधकांचे मोठे आव्हान कल्याणराव काळे यांच्यासमोर असणार आहे. Kalyanrao Kale is facing the challenge of opponents including his own in front of Kalyanrao Kale in the election of Sahakar Shiromani

 

कारखाना निवडणुकीपूर्वीच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि कल्याणराव काळे यांचे सावत्र बंधू समाधान काळे यांनी बंडाचे निशाण पेटवले होते. काळे गटात होणारी घुसमट समाधान काळे यांनी जाहीररित्या व्यक्त केली होती. युवकांच्या भावना जाणून घेण्यासाठी त्यांनी गाव भेट दौरे देखील केले होते. मात्र अडचणीच्या काळात साथ सोडून जाणे आणि निवडणुकीनंतर अपेक्षित निकाल न लागल्यास त्याचे खापर आपल्यावर फुटू नये, या भावनेतून समाधान काळे यांनी आपले बंड थंड केले.

 

कल्याणराव काळे यांचा कारखाना म्हणजे त्यांचं स्वतःचं आणि नातेवाईकांचं साम्राज्य होतं. उसाला दर न देणे, कामगाराच्या पगारी न देणे, ऊस वाहतूक तोडणीदारांची देणे न देणे या अशा गोष्टीमुळे जवळचे नातेवाईक देखील दुखावले आणि दुरावले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

दीपक पवार, नंदकुमार बागल, धनंजय काळे, बाबा काळे यासह अनेक नातेवाईकांनी कल्याणराव काळे यांच्यापासून फारकत घेत कल्याणराव काळे यांच्या विरोधात आता रान पेटवले आहे.

 

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सत्ता काबीज केल्यानंतर सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्यावर सत्ता काबीज करण्यासाठी अभिजीत पाटील आणि डॉ. बी.पी रोंगे सर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मागील आणि चालू गळीत हंगामातील ऊस बिले देऊन अभिजीत पाटील यांनी सहकार शिरोमणीचे रणसिंग फुंकले आहे. अभिजीत पाटील गटाने मोठे शक्ती प्रदर्शन करत हजारो सभासदांना एकत्रित आणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

एकंदरीत पहिल्यांदाच सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अत्यंत चुरशीने होत आहे. दीपक पवार, नंदकुमार बागल, धनंजय काळे अशा जवळच्या नातेवाईकांनी कल्याणराव काळे यांच्या विरोधात रान उठवले आहे. अभिजीत पाटील यांनी डॉ बीपी रोंगे सरांनी निवडणुकीत जोर झाल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #KalyanraoKale #facing #challenge #opponents #including #own #front #KalyanraoKale #election #Sahakar #Shiromani, #सहकार #शिरोमणी #निवडणूक #कल्याणरावकाळे #स्वकीयांसह #विरोधक #आव्हान #कल्याणरावकाळे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपचे तिन्ही आमदार एकत्र येणार; माने- हसापुरे एकदिलाने लढणार
Next Article flying kisses दुकानात काम करणाऱ्या महिलेला फ्लाईंग किस देत केला विनयभंग

Latest News

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा – राज्यपाल
महाराष्ट्र May 30, 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती – एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन
महाराष्ट्र May 30, 2025
नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक
देश - विदेश May 30, 2025
भंडाऱ्यात लुटणाऱ्या चौघांना अटक
महाराष्ट्र May 30, 2025
गोंदियात इलेक्ट्रिक खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद, ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र May 30, 2025
नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान
देश - विदेश May 30, 2025
राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद
महाराष्ट्र May 30, 2025
पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर
देश - विदेश May 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?