पुणे, 12 मे (हिं.स.)।
गुणवत्ता व अभिनवतेचे शहर ही कायमच पुण्याची ओळख राहिलेली आहे. उडाण योजनेंतर्गत हवाई जोडणीचा विस्तार आणि प्रवासी वाहतुकीतील वाढ यामुळे या भागातील तरुणांना योग्य वेळी कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होत आहेत,’ असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
विमानवाहतूक क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य विकासासाठी ‘ग्लोबल फ्लाइट हँडलिंग सर्व्हिसेस’ची प्रशिक्षण शाखा असलेल्या ‘ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशन’तर्फे प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ‘ग्लोबल फ्लाइट हँडलिंग सर्व्हिसेस’च्या व्यवस्थापकीय संचालिका सरिता कुमारी उपस्थित होत्या. ‘एरोमॉल’मध्ये हे प्रशिक्षण केंद्र सुरू झाले असून, त्यात विमानचालन प्रशिक्षण मिळणार आहे.