Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महापालिका आयुक्तांनी काढले कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

महापालिका आयुक्तांनी काढले कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Surajya Digital
Last updated: 2023/04/06 at 8:54 PM
Surajya Digital
Share
7 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ 6 जणांची कार्यालय अधीक्षकपदी पदोन्नती !○ 29 वरिष्ठ श्रेणी लिपिक झाले वरिष्ठ मुख्य लेखनिक○ 47 जणांना वरिष्ठ श्रेणी लिपिकपदी मिळाली पदोन्नती

○ 6 वरिष्ठ मुख्य लेखनिक झाले कार्यालय अधीक्षक; काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या !

 

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील 136 कर्मचारी व अधिकाऱ्यांना खाते अंतर्गत पदोन्नतीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आज गुरुवारी महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी पदोन्नतीचे कार्यालयीन आदेश काढले आहेत.  Municipal commissioner issued orders for promotion of employees, atmosphere of happiness among employees, Solapur  यामुळे 6 वरिष्ठ मुख्य लेखनिक यांची कार्यालय अधीक्षक पदी पदोन्नती झाली तर 29 वरिष्ठ श्रेणी लिपिक हे वरिष्ठ मुख्य लेखनिक झाले आहेत. 47 कनिष्ठ श्रेणी लिपिकांची वरिष्ठ श्रेणी लिपिक पदी पदोन्नती करण्यात आली आहे. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत.

 

सोलापूर महापालिकेतील 12 संवर्गातील अवेक्षक ते कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक ते कार्यालय अधीक्षक पर्यंतच्या एकूण 136 कर्मचाऱ्यांना खाते अंतर्गत पदोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी घेतला. सोलापूर महापालिकेतील बिंदू नामावली (रोस्टर) आजतागायत करण्यात आले नव्हते. ते रोस्टर महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या कारकिर्दीत अखेर तपासून घेण्यात आले. त्यानंतर आता अनेक वर्षापासून पदोन्नतीचा प्रलंबित असलेला निर्णय अखेर महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. दरम्यान आज गुरुवारी पदोन्नतीचे कार्यालयीन आदेश महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी काढले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पदोन्नतीमुळे कर्मचारी एकमेकांचे अभिनंदन करत असल्याचे दिसून आले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

○ 6 जणांची कार्यालय अधीक्षकपदी पदोन्नती !

सहा वरिष्ठ मुख्य लेखनिक यांची कार्यालय अधीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागातील लक्ष्मीनारायण दोंतुल यांची याच सामान्य प्रशासन कार्यालयात कार्यालय अधीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली आहे. मंडई विभागातील जगन्नाथ बनसोडे यांचीही याच विभागात मुख्य अधीक्षक पदी पदोन्नती केली आहे.

इतर कर्मचाऱ्यांचे नाव व पदोन्नती नंतरचे कार्यालय व पदनाम असे –

विभागीय कार्यालय क्रमांक 1 येथील उज्वला डांगे ( विभागीय कार्यालय क्रमांक 4 – कार्यालय अधीक्षक), नगरसचिव कार्यालयातील जगन्नाथ माढेकर ( सार्वजनिक आरोग्य अभियंता – कार्यालय अधीक्षक), विभागीय कार्यालय क्रमांक 4 येथील ओमप्रकाश वाघमारे ( नगरसचिव कार्यालय – सहाय्यक नगरसचिव), घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सुरेश खसगे ( मालमत्ता कर – कर अधीक्षक) आदी.

 

○ 29 वरिष्ठ श्रेणी लिपिक झाले वरिष्ठ मुख्य लेखनिक

वरिष्ठ श्रेणी लिपिक यांची वरिष्ठ मुख्य लेखनिक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे नाव आणि पदोन्नती नंतरचे कार्यालय असे – मालमत्ता कार्यालयातील जयवंत फुटाणे ( मालमत्ता कर कार्यालय), प्रशांत जाधव (भूमी व मालमत्ता विभाग), मल्लिनाथ तोडकर (घनकचरा व्यवस्थापन विभाग), अमर कादे (अंतर्गत लेखा परीक्षक), शलमोन रावडे (मालमत्ता कर विभाग), विलास कुलकर्णी (मुख्य लेखापाल कार्यालय – सहाय्यक लेखापाल), रवींद्र कंदलगी (विभागीय कार्यालय क्रमांक चार), नागनाथ कोकणे (मालमत्ता कर कार्यालय), नितीन परदेशी (मालमत्ता कर विभाग), चन्नप्पा म्हेत्रे ( मालमत्ता कर विभाग), जयंत क्षीरसागर (मुख्य लेखा परीक्षक कार्यालय), सुजात वाळके (विभागीय कार्यालय क्रमांक 1 ) , राजकुमार कांबळे (घनकचरा व्यवस्थापन विभाग), सुनील वाडिया( विभागीय कार्यालय क्रमांक सहा), पुष्पांजली देसाई (विभागीय कार्यालय क्रमांक आठ), अमोल पवार (मालमत्ता कर विभाग), लक्ष्मण सुरवसे (अंतर्गत लेखा परीक्षक कार्यालय), महादेव काटगावकर (विभागीय कार्यालय क्रमांक तीन), राजू शिवशिंपी (नगर अभियंता कार्यालय), प्रणिता लोखंडे (विभागीय कार्यालय क्रमांक सात), जालिंदर पकाले (सामान्य प्रशासन विभाग), सिद्राम गुडदोर (निवडणूक कार्यालय), देविदास इंगोले (अभिलेखापाल कार्यालय) , राजकुमार सोनसळे (विभागीय कार्यालय 5), सूर्यकांत पांढरे (सामान्य प्रशासन विभाग), प्रदीप जोशी (हुतात्मा स्मृती मंदिर व्यवस्थापक), चंद्रकांत दोंतुल (विभागीय कार्यालय 2), संजय जगताप (मालमत्ता कर विभाग) आदी.

 

○ 47 जणांना वरिष्ठ श्रेणी लिपिकपदी मिळाली पदोन्नती

यामध्ये एकूण 47 कनिष्ठ श्रेणी लिपिक यांना वरिष्ठ श्रेणी लिपिक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे नाव आणि पदोन्नती नंतरचे कार्यालय याप्रमाणे – वसंत वाघमारे (विभागीय कार्यालय क्रमांक चार), काशिनाथ आमणे (अंतर्गत लेखापरीक्षक कार्यालय), रतनसिंग रजपूत (मालमत्ता कर विभाग), शिवकुमार धनशेट्टी (हुतात्मा स्मृती मंदिर), एलिझाबेथ शिरशेट्टी (मुख्य लेखापाल कार्यालय), भीमाशंकर पदमगोंडा (मुख्य लेखापाल कार्यालय), विकास सरवदे (मालमत्ता कर विभाग), पंडित वडतीले (आयुक्त कार्यालय), रमेश चौधरी (भूमी व मालमत्ता कार्यालय), लक्ष्मीनारायण दुभाषी (मालमत्ता कर विभाग), मिलिंद एकबोटे (सामान्य प्रशासन विभाग), पंडित जानकर (भूमी व मालमत्ता कार्यालय), प्रशांत उपळेकर (मालमत्ता कर विभाग), अरविंद दोमल( मालमत्ता कर विभाग), बाळू शिवशरण (मालमत्ता कर विभाग), भारती चोपडे (मुख्य लेखा परीक्षक कार्यालय), शिवानंद कोरे (मुख्य लेखापाल कार्यालय), शकीलअहमद कोरबू (मालमत्ता कर विभाग), सुनील व्यवहारे (मालमत्ता कर विभाग), भाग्यश्री जगताप (मुख्य लेखा परीक्षक कार्यालय), महंमदबिलाल शेख (मालमत्ता कर विभाग), रणजीतसिंग तारवाले (मालमत्ता कर विभाग) गौरीशंकरय्या स्वामी (मालमत्ता कर विभाग), यादगिरी आबत्तींनी (मुख्या लेखापाल कार्यालय), अर्चना दीक्षित (अंतर्गत लेखा परीक्षक कार्यालय), गंगाधर मलाडे (मालमत्ता कर विभाग), प्रशांत इंगळे (सामान्य प्रशासन विभाग), मोहन बुगले (उद्यान विभाग), अशोक पाटील (मंडई विभाग), मारुती गायकवाड (नगररचना कार्यालय), अंजनय्या म्हेत्रे (मालमत्ता कर विभाग), सुभाष निकंबे (मुख्य लेखापाल कार्यालय), रमेश जाधव (मालमत्ता कर विभाग), राजू पाटील (अतिरिक्त आयुक्त कार्यालय), सिद्राम पाटील (मुख्य लेखा परीक्षक कार्यालय), फिरोज पठाण (मंडई विभाग), हेमंत रासने (सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय), उत्तरेश्वर मन्मथ चादोडे (मालमत्ता कर विभाग), तेजस्विता कासार (विभागीय कार्यालय क्रमांक आठ), आनंद शिरसागर (नगर अभियंता कार्यालय), सिद्धाराम कुंभार (मालमत्ता कर विभाग), लियाकत खैरदी (मंडई विभाग), चंद्रकांत कुडल ( सामान्य प्रशासन विभाग), शहाजहाबेगस शेख (आरोग्य विभाग), अशोक म्हेत्रे (मालमत्ता कर विभाग), सोमनाथ ताकभाते (नगर अभियंता कार्यालय), सुरेश अंभोरे (मालमत्ता कर विभाग)आदी.

 

या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदोन्नतीच्या पदावर आदेश मिळाल्याच्या दिनांक पासून तीन दिवसांच्या आत रुजू करून संबंधित खाते प्रमुखांनी विना विलंब कार्यमुक्त करावे. सेवकांनी त्यांच्याकडील असलेल्या पदाचा कार्यभार संबंधित कार्यालयाचे प्रमुख यांच्याकडे हस्तांतर करावा असे या आदेशात नमूद केले आहे.

 

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Municipal #commissioner #issued #orders #promotion #employees #atmosphere #happiness #among #employees #Solapur, #सोलापूर #महापालिका #आयुक्तपद #धनराजपांडे #नावाची #चर्चा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article घर वेळेत सोडेन, आईकडे राहायला जाणार राहुल गांधी
Next Article लाच घेताना एक्साईजच्या निरीक्षकासह तिघे ‘एसीबी’च्या जाळ्यात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?