Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात एच.आर.सी.टी. स्कॅनिंग आजपासून सुरु होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात एच.आर.सी.टी. स्कॅनिंग आजपासून सुरु होणार

Surajya Digital
Last updated: 2020/07/23 at 10:07 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

उस्मानाबाद : शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथे नवीन सी. टी. स्कॅन मशीन असूनदेखील कोविड – १९ च्या रुग्णांच्या योग्य निदान चाचणीसाठी अतिशय उपयुक्त व मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असलेले छातीचे एच.आर.सी.टी. स्कॅन केले जात नाहीत. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून एच.आर.सी.टी. स्कॅनिंग तातडीने सुरु करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती व त्या अनुषंगाने आजपासून ही निदान प्रक्रिया सुरु होणार आहे.

उस्मानाबाद येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गत वर्षी खरेदी करून कार्यान्वित करण्यात आलेल्या सी.टी. स्कॅन मशीनचा उपयोग एच.आर.सि.टी. स्कॅनिंग साठी होत नसल्याने आ. पाटील यांनी हे मशीन कोविड -१९ ची लागण झालेल्या रुग्णाच्या छातीचा एच.आर.सी.टी. स्कॅनिंग करणेसाठी तातडीने वापरण्यात यावी, अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे १९ जुलै रोजीच्या उस्मानाबाद दौऱ्या दरम्यान झालेल्या बैठकीत केली होती.

२१ ऑक्टोबर, २०१९ रोजी नवीन सी.टी. स्कॅन मशीन शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथे कार्यान्वित करण्यात आली होती. सदरील मशिन कॅनॉन कंपनीची असुन १६ स्लाईसची आहे व त्या द्वारे axial scanning पद्धतीने स्कॅन केले जाते. सद्यस्थितीत या मशिनद्वारे प्रति महिना ३५० ते ४०० पेशंटचे सी. टी. स्कॅन होत आहे, याद्वारे ब्रेन व PNS स्कॅन केले जात आहे.

कोविड-१९ च्या लढ्यात संक्रमित रुग्णांची निदान चाचणी करत असताना RT-PCR व Rapid Antigen Test (जलद प्रतिजैविक चाचणी) सह छातीचा एच.आर.सी.टी. (उच्च-रिझोल्यूशन संगणकीकृत टोमोग्राफी) स्कॅनिंग घेणे उपयुक्त असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. कोविड-१९ च्या संसर्गामुळे रुग्णाच्या छातीत विषाणूचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे हे पाहून रुग्णांना योग्य औषधोपचार करणे शक्य होते व रुग्णांची स्थिती बिघडण्यापासून बचाव करण्यास मदत होते, याबाबत आ. पाटील यांनी अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #उस्मानाबाद #जिल्हारुग्णालय #राणाजगजितसिंहपाटील #कोरोना #बैठक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री रामाची आठवण करून देण्यासाठी शरद पवारांना ‘जय श्री राम’ लिहलेले 10 लाख पत्र पाठवणार
Next Article राजस्थानच्या मुख्यमंञ्यांचे थेट पंतप्रधानांना पञ; म्हटले इतिहास कधीच माफ करणार नाही

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?