Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दुष्काळ दौ-यात फडणवीसांनी चोरली राज ठाकरेंच्या स्टाइलची कॉपी; ‘लाव रे तो’ व्हिडीओचा केला प्रयोग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

दुष्काळ दौ-यात फडणवीसांनी चोरली राज ठाकरेंच्या स्टाइलची कॉपी; ‘लाव रे तो’ व्हिडीओचा केला प्रयोग

Surajya Digital
Last updated: 2020/10/20 at 10:59 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

उस्मानाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या झालेल्या हानीमुळे त्यांना मदत मोठ्या प्रमाणात मदत करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांचा पूर्वीचा शेतकऱ्यांना मदतीची मागणी करणारा व्हिडीओ दाखवून आता हीच संधी आहे, अशी आठवणच फडणवीसांनी करून दिली आहे.

दरम्यान सत्तेत येण्याआधी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय मागणी केली होती, त्याबद्दलचा जुना व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांनी थेट पत्रकार परिषदेत दाखवला आहे. उस्मानाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्टाइलची कॉपी करत ‘लाव रे तो’ व्हिडीओ प्रयोग केला आहे. या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये आणि बागायतीसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. त्यांचा हा व्हिडीओ दाखवून आता तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही जी वारंवार मागणी करत होता, आता ती पूर्ण करण्याची हीच संधी आहे, असा सणसणीत टोला फडणवीस यांनी लगावला.

* कर्ज काढणे पाप नाही – फडणवीस

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील काही भागांचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती बघितली. यानंतर पत्रकार परिषदेत आवश्यकता असेल तर कर्ज काढलं पाहिजे असा चांगला सल्ला दिला होता. दरम्यान यावर विचारलेल्या प्रश्नावर कर्ज काढणे हे काही पाप नाही. आपले जे बजेट आहे. त्यातील ७० ते ८० टक्के रक्कम कर्जातून येते. आपल्याला १ लाख २० हजार कोटींचं कर्ज काढता येते. आतापर्यंत ६० हजार कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करता येईल, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

 

* हात झटकण्यात तिन्ही पक्ष तरबेज

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याला जसा जीएसटी येतो तसा जीएसटी केंद्रालाही मिळत नाही. मार्चपर्यंतचं अनुदान २० हजार कोटी रुपयांपर्यंत मिळालं आहे. केंद्र सरकार कर्ज काढून राज्यांना जीएसटीचे पैसा देत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने जर पदरचा पैसा खर्च केला तर तो पैसा परत मिळणार आहे. मात्र हात झटकण्यात तिन्ही पक्ष तरबेज आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे. राज्यात काही संकट आले की, नेहमी केंद्राकडेच बोट दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.असंही त्यांनी म्हटलं आहे.

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article १०० पोलिस हेल्पलाईन क्रमांक होणार बंद; ११२ हा नंबर सेव्ह करुन ठेवा
Next Article ट्रॅव्हल्स दरीत कोसळली, चारजणांचा मृत्यू तर 35 जण जखमी

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?