नाशिक, 14 मे (हिं.स.)।
– राज ठाकरे यांनी दिलेल्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद आहे आणि भविष्यातही आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ अशी भूमिका स्पष्ट करताना उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की , महानगरपालिका या प्रशासकांच्या ताब्यात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे हाल होत आहे त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेतल्या पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे एका खाजगी कार्यक्रमासाठी मंगळवारी सायंकाळी नाशिक मध्ये आले होते त्यानंतर बुधवारी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एकत्र येण्यासंदर्भात जी सकारात्मक भूमिका मांडली होती त्याला आमचा प्रतिसाद हा कालही आहे उद्याही राहील पण त्यासाठी आमची एकच अट आहे की जे महाराष्ट्र द्रोही आहे त्यांच्याशी त्यांनी युती किंवा संबंध ठेवू नये हीच आमची भूमिका आहे
असे सांगून संजय राऊत म्हणाले की राज ठाकरे यांच्यासाठी आमचे दरवाजे हे उघडे आहेत स्पष्ट करताना एका प्रश्नाला उत्तर दे ते पुढे म्हणाले की आजही राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे कौतुकच केले पाहिजे कारण त्यांनी कधीही खोट्या पद्धतीप्रमाणे शिवसेनेवर दावा सांगितला नाही. शिंदे – अजित पवार यांनी ज्या पद्धतीप्रमाणे आपला पक्षाचा बाप समोर असताना देखील खोट्या पद्धतीप्रमाणे दावा सांगून पक्ष लुटण्याचा जो प्रयत्न केला तो चुकीचा आहे असे राज ठाकरे आणि नारायण राणे कधीच वागले नाही राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष चालवला तर नारायण राणे यांना स्वतःचा पक्ष चालवता न आल्याने ते दुसऱ्या पक्षात गेले ही भूमिका योग्य आहे.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना भाजपावरती देखील संजय राऊत यांनी टीका केली आहे ते म्हणाले की जोपर्यंत महानगरपालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम मॅनेज होत नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत यावेळी भाजप हे सर्व करेल त्याच वेळी निवडणुकांच्या तारखा घोषित होतील सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या आदेशाचे पालन केले पाहिजे असे स्पष्ट करत राऊत पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीप्रमाणे सत्तावीस महानगरपालिका हद्दीमध्ये आज प्रश्न उभे आहेत ते बघितले तर प्रशासकांनी कोणतेही कामकाज केलेले नाही त्यांनी फक्त एक खिडकीच्या माध्यमातून सरकारची हुजेरी केली पण स्थानिक प्रश्न मात्र सोडवले नाही त्यामुळे आज पावसाळा सुरू झाला आहे असं म्हटलं तर वाव ठरणार नाही आणि सर्व प्रशासकांचे पितळ हे उघडे पडलेले आहेत.