Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंदिर उघडण्याची मागणी : औरंगाबादमध्ये तणावाची परिस्थिती, शिवसेना आणि एमआयएम आमने – सामने
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मंदिर उघडण्याची मागणी : औरंगाबादमध्ये तणावाची परिस्थिती, शिवसेना आणि एमआयएम आमने – सामने

Surajya Digital
Last updated: 2020/09/01 at 5:22 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि एमआयएम आमनेसामने उभे ठाकले आहेत. खडकेश्वर मंदिर उघडण्यासाठी पुजाऱ्यांना निवेदन देण्याची घोषणा एमआयएमने करताच शिवसैनिकांनी खडकेश्वर मंदिराभोवती गराडा घातला. त्यामुळे शहरात तणावासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांच्या विनंतीवरून एमआयएमने आजचं आंदोलन स्थगित केलं आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील सर्व धार्मिकस्थळं उघडण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. धार्मिकस्थळं न उघडल्यास १ तारखेला औरंगाबादमधील मंदिरातील पुजाऱ्यांना निवेदनं देण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. त्यानुसार जलील हे आज दुपारी २ वाजता खडकेश्वर मंदिरात येऊन पुजाऱ्यांना निवेदन देणार होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मात्र, ही माहिती मिळताच शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी शेकडो शिवसैनिकांसह खडकेश्वर मंदिरात धाव घेतली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी इम्तियाज जलील यांच्या घरी धाव घेऊन त्यांना आजचं आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. त्यामुळे जलील यांनी हे आंदोलन मागे घेतलं.

आज गणेश विसर्जन असून हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे. या निमित्तानं हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री मंदिरं सुरू करून हिंदू धर्मियांना अनोखी भेट देतील, असं मला वाटलं होतं. त्यामुळेच मंदिर आंदोलनासाठी आजचा दिवस निवडला होता, असं सांगतानाच आम्ही आंदोलनाची हाक दिल्यानंतर शिवसेना खडकेश्वर मंदिराजवळ जाऊन मंदिरं खुली करण्याची भाषा करते हे आमच्या आंदोलनाचं फलित असून एक प्रकारे आमचं आंदोलन यशस्वीच झालं आहे, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं.

“आज गणेश विसर्जन आहे. त्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आहे. आज आम्ही आंदोलन केल्यास कामाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे आंदोलन मागे घ्या, अशी विनंती मला पोलिसांनी केली. त्यामुळे पोलिसांवर कोणताही ताण निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आजचं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. उद्या मात्र आम्ही मशिदीत जाणार असून मशिदी खुली करण्याचं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं नाही”

इम्तियाज जलील – खासदार

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #औरंगाबाद #एमआयएम #तणाव #मंदिर #आमनेसामने #जलील #खैरे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एकाच कुटुंबातील चौघांचा खून; खांडोळ्या करुन मेढा मारली घाटात टाकले, सांगलीतील कुटुंब
Next Article सोलापुरातील बार्शीत चक्क ‘कोरोना देवी’चे मंदिर; कोरोना देवीला खुश करण्यासाठी कोंबडे – बक-यांचे बळी

Latest News

Почему переживание угрозы создает жизнь увлекательнее
Top News December 12, 2025
Отчего ожидание исхода порождает душевное стресс
Top News December 12, 2025
Почему человек имеют тенденцию выявлять закономерности в удаче
Top News December 12, 2025
Зачем человеку нравится играть с шансами
Top News December 12, 2025
Механизм действия механизм вознаграждения в мозговых структурах
Top News December 12, 2025
Механизм действия механизм поощрения в головном мозге
Top News December 12, 2025
Beste online Casinos Liste: Übersicht Top 25 Deutschland
Top News December 11, 2025
Отчего даже крохотный успех создает радость
Top News December 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?