Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमरावतीत कोरोनाचे थैमान, मात्र आमदार-खासदार विनामास्क बुलेटवर सुसाट, व्हिडिओ व्हायरल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

अमरावतीत कोरोनाचे थैमान, मात्र आमदार-खासदार विनामास्क बुलेटवर सुसाट, व्हिडिओ व्हायरल

Surajya Digital
Last updated: 2021/02/19 at 9:13 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अमरावती : अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यातच आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर राणा यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात राणा दाम्पत्य बुलेटवर विनामास्क फिरताना दिसत आहेत. त्यामुळे यावर नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. कोरोना वाढतोय याचे गांभीर्य त्यांना दिसत नाही, असं लोक म्हणत आहेत. तसेच पोलीस राणा दाम्पत्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न ते करत आहेत.

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे थैमान दिसून येत आहे. आमदार-खासदार विनामास्क सुसाट असल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राणा दाम्पत्याची विनामास्क आणि विनाहेल्मेट बुलेटवारी चर्चाचा विषय झाली आहे. हा लोकप्रतिनिधींचा बेजबाबदारपणा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. आधीच कोरोनाचा धोका जिल्ह्यात असताना अशी बेफीर कशासाठी, अशाने कोरोना वाढला तर जबाबदार कोण, असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

एकीकडे अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रत्येकाला मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच आता पोलिसांनी प्रत्येक दुचाकीस्वारांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. पण अमरावतीच्या खासदार नवनीत कौर-राणा आणि आमदार रवी राणा यांना मात्र कोरोना वाढतोय याचे गांभीर्य दिसत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लोकप्रतिनिधी असणाऱ्या राणा दांपत्याने कोरोनाचे नियम पायदळी तुडवत विना मास्क आणि विना हेल्मेट अमरावती शहरात बुलेट वारी केली. आता पोलीस राणा दाम्पत्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

* आधी कोरोना होऊनही बेफिक्री

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना याआधी कोरोना झाला होता. नवनीत कौर राणा यांना दोन वेळा कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना ऑगस्ट २०२० मध्ये तातडीने मुंबईत हलविण्यात आले होते. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुंबई महापालिकेकडून त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे पालिकेकडून त्यांना पुढील 15 दिवस क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. असे असताना त्यांच्याकडून कोविड-19 च्या नियमांची पायमल्ली कशासाठी, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Outbreak #coronavirus #Amravati #mla&mp #withoutmask #onbullet, #अमरावतीत #कोरोनाचे #थैमान #आमदार-खासदार #विनामास्क #बुलेटवर #सुसाट, #व्हिडिओव्हायरल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार?
Next Article भाजपच्या महिला नेत्याच्या कारमध्ये सापडला ड्रग्सचा साठा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?