Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वळसंग हद्दीत आराम बस उलटून एक ठार, सहा जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

वळसंग हद्दीत आराम बस उलटून एक ठार, सहा जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/09/12 at 8:18 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
मयत मो. नासिर शेख
SHARE

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर – अक्कलकोट महामार्गावरील लिंबीचिंचोळी गावाच्या परिसरात आज सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील खासगी बस उलटून अपघात झाला. यात एक ठार तर सहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती वळसंग पोलिसांनी दिली. One killed, six injured after Aram bus overturns in Valsang area, Akkalkot road, Solapur

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ तेजस कांबळे याच्यावर तडीपारीची कारवाई

 

अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. मो. नासिर शेख (वय 58, रा. गुलबर्गा) असे मयत चालकाचे नाव आहे. लिंगम्मा मल्लम्मा पुजारी (वय 54, रायचूर, कर्नाटक), रुकमा शेख (वय 77, मुंबई), अमरीश कोडी (वय 37, गुलबर्गा) सतीश कुमार (वय 39, यादगिर), राजाराम कष्टे (वय 65 आळंद, कर्नाटक), अनिल राठोड (वय 22, शहापूर, यादगिर) असे जखमी प्रवाशांची नावे आहेत. बसमधील जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन कर्नाटकातील भाविक पहाटेच्या सुमारास सोलापूरकडे येत होते. वळसंग गावाहून लिंबीचिंचोळी हद्दीत गाडी येत असताना पुलावरील डिव्हायडरवर चढल्याने अपघात झाला. याचवेळी चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर वळसंग पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. बसमधील जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ तेजस कांबळे याच्यावर तडीपारीची कारवाई

सोलापूर :  आगामी काळातील सण-उत्सव, मिरवणुका व महानगरपालिका निवडणूकच्या दरम्यान शहरात कोणताही  अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी व चोरी करणारा सराईत गुन्हेगार तेजस धर्मपाल कांबळे (वय-२१,रा.घ.नं.७५,गोकूळ नगर,जुळे सोलापूर) यास दोन वर्ष तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
विजापूर नाका पोलीस ठाणेच्या हद्दीत घरफोडी चोरी करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकुण ०६ गुन्हे त्याच्यावर दाखल आहे.  त्यामुळे त्याच्यावर शुक्रवारी  (ता. ९ सप्टेंबर)  विजापुर नाका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेवून, सोलापूर शहर व जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील  इंदापूर तालुक्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.

 

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #One #killed #six #injured #Aram #bus #overturns #Valsang #area #Akkalkot #road #Solapur, #सोलापूर #वळसंग #हद्दीत #आरामबस #उलटून #एक #ठार #सहाजखमी #अक्कलकोट #रस्ता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खरी शिवसेना शिंदेंचीच, धनुष्यबाणही मिळणार – नारायण राणे
Next Article सोलापूरच्या महिला सरपंच बेपत्ता, सहा दिवस लोटले, शोध लागेना

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?