नवी दिल्ली, 22 जून (हिं.स.):
जम्मू
आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांना
आश्रय दिल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्था अर्थातच एनआयएने दोन स्थानिक
रहिवाशांना अटक केली आहे.एनआयएनेअनेक स्थानिक प्रत्यक्षदर्शींची चौकशी
केल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये २००० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात
आली आहे. चौकशी केलेल्या काही लोकांवर सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गतही गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.एएनआय, नवी दिल्ली. परवेझ अहमद आणि बशीर अहमद अशी अटक केलेल्या या दोन
आरोपींची नावे आहेत.
अटक
करण्यात आलेले दोघेही पहलगामचे रहिवासी आहेत. तपास यंत्रणेने त्यांच्या निवेदनात
माहिती दिली की, पहलगामच्या बटकोटमधील परवेझ अहमद जोथर
आणि पहलगामच्या हिल पार्क येथील बशीर अहमद जोथर यांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या ३
दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. दोघांनीही अशी माहिती दिली की, पहलगाम हल्ल्यात
सहभागी असलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित पाकिस्तानी नागरिक होते.
२२
एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला
होता. —————