Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहलगाम दहशतवादी हल्ला : डोंबिवलीच्या तिघांना मुख्यमंत्र्यांकडून श्रदांजली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

पहलगाम दहशतवादी हल्ला : डोंबिवलीच्या तिघांना मुख्यमंत्र्यांकडून श्रदांजली

admin
Last updated: 2025/04/24 at 1:21 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 24 एप्रिल (हिं.स.)।जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना बुधवारी (दि.23) रात्री डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून मृत पावलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. या तिघांना बुधवारी(दि.२३) डोंबिवलीत भगशाला मैदानात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत पावलेल्या तिघांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार जगन्नाथ पाटील,आमदार सुलभा गायकवाड, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस सहआयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी घटनास्थळी भेट देऊन पीडितांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. नागरिकांनी एकापाठोपाठ एक येत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्याने वातावरणात शांतता आणि दुःख पसरले होते.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान संतप्त नागरिकांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि सर्व पाकिस्तानी उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. अनेकजण भावुक होऊन फडणवीस यांना म्हणाले, “फक्त तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता.” रात्री ९:०० च्या सुमारास फुलांनी सजलेल्या वाहनांमधून या तिघांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. यापूर्वी हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत मोठी अंत्ययात्रा काढण्यात आली. “भावपूर्ण श्रद्धांजली” असे मोठे बॅनर वाहनावर लावण्यात आले होते, ज्यावर मृतांची नावे आणि छायाचित्रे होती.

ही अंत्ययात्रा डोंबिवलीतील डोमिनोज पिझ्झा, एम. जी. रोड, डोंबिवली स्टेशन (पश्चिम), कोपर रोड, कोपर ब्रिज, टंडन रोड, आर. पी. रोड या प्रमुख मार्गांवरून गेली आणि शेवटी शिव मंदिर रोडवरील स्मशानभूमीत या तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिक यावेळी आपल्या भावनांना आवरू शकले नाहीत. अंत्यसंस्कारापूर्वी भगशाला मैदानात स्मशान शांतता पसरली होती. या घटनेमुळे समुदायाला बसलेला मोठा मानसिक आघात वातावरणात स्पष्टपणे जाणवत होता. यापूर्वी, जेव्हा पार्थिव विमानतळावर पोहोचले, तेव्हा अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी राज्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पहेलगाम अतिरेकी हल्ल्याचा संगमनेर काँग्रेसकडून तीव्र निषेध
Next Article पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक, एक जवान हुतात्मा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?