Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय

admin
Last updated: 2025/05/08 at 6:26 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमृतसर, 08 मे (हिं.स.) : पाकिस्तानने भारतीय शहरांना लक्ष्य करीत सोडलेले मिसाईल्स आणि ड्रोन्स भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने नष्ट केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न पूर्णपणे निष्क्रीय ठरला आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या जिहादी दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलिंग केले होते. या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने 6 आणि 7 मे च्या रात्री पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळं उध्वस्त केलीत. यानंतर पाकिस्तानने 7 आणि 8 मे च्या रात्री भारताच्या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानचा हल्ला पुर्णपणे निष्क्रीय झाला असून पाकिस्तानी मिसाईलचे अवशेष पडलेले आढळून आले आहेत.

पंजाबच्या अमृतसर परिसरात अनेक ठिकाणी पाकिस्तानी मिसाईलचे अवशेष आढळून आलेत. स्थानिक ग्रामस्थांना आज, गुरुवारी सकाळी हे अवशेष आढळून आल्यानंतर याबाबत पोलिसांना आणि सैन्याला कळवण्यात आले. त्यानंतर पोलिस आणि सैन्य अधिकाऱ्यांनी हे तुकडे आपल्या ताब्यात घेतले आहेत. एकीकडे पाकिस्तानची स्वतःची एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त झाली असतानाच भारतीय एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसून आले.

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
Next Article पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?