इस्लामाबाद, 12 ऑगस्ट – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला असून, पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालय आणि राजदूतांच्या निवासस्थानांना मिनरल वॉटर, गॅस आणि वर्तमानपत्रांचा पुरवठा थांबवला आहे. हा निर्णय भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रत्युत्तर म्हणून घेतल्याचे सांगितले जाते.
भारतीय राजदूतांना गॅस व पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्थानिक गॅस सिलिंडर पुरवठादार आणि दुकानदारांना भारतीय राजदूतांना या सुविधा न पुरवण्याचे निर्देश पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. अहवालानुसार, हे पाऊल पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या योजनेचा भाग असून, सूड घेण्यासाठी लहान स्वरूपातील कारवाया केल्या जात आहेत.
अशीच कारवाई पाकिस्तानने यापूर्वीही केली होती. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय राजदूतांना अशाच प्रकारे त्रास दिला होता. प्रत्युत्तरादाखल, भारताने दिल्लीत तैनात पाकिस्तानी राजदूतांना वर्तमानपत्रांचा पुरवठा बंद केला होता.