Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पालखी महामार्गाच्या कामात माळीनगरातील ‘खुले रंगमंच’ होतंय जमीनदोस्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पालखी महामार्गाच्या कामात माळीनगरातील ‘खुले रंगमंच’ होतंय जमीनदोस्त

Surajya Digital
Last updated: 2021/12/09 at 10:15 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

माळीनगर : पालखी महामार्गाच्या काम जोरात चालू आहे. मात्र या कामामध्ये माळीनगरातीलखुले रंगमंच जमीनदोस्त होत आहे. या रंगमंचाने महाराष्ट्रातील अनेक कलावंतांना राजाश्रय दिलाय. पालखी सोहळ्यावेळी हे रंगमंच वारक-यांची सेवा करीत होते. आज तोच रंगमंच पाडला जातोय.

माळीनगर गावाला अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वतःचा स्वतंत्र इतिहास आहे. माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी कारखान्याच्या स्थापनेपासून साधारण १९३२ पासून इथे लोकवस्त्या , प्राथमिक व माध्यमिक शाळा , इंग्रजी माध्यम शाळा यांची इथल्या सासवड माळी एज्युकेशन सोसायटीने स्थापना केली.

काळानुरूप गावाला मनोरंजनाचे मुक्त व्यासपीठ व्हावे , पालखी सोहळ्यावेळी निवारा असावा यासाठी भारदस्त खुले रंगमंच बांधण्यात आले. माळीनगर गावात या खुल्या रंगमंचावर अनेक दिग्गज कलावंत मंडळी नाटके , एकपात्री प्रयोग , नृत्य सादर करून गेले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या रंगमंचाने महाराष्ट्रातील अनेक कलावंतांना राजाश्रय दिला, अगदी चोख नियोजन , नेपथ्य , बैठक व्यवस्था, यामुळे कानाकोपऱ्यात लोकं इथे कार्यक्रम पाहण्यासाठी येत होती. माळीनगर फेस्टिव्हलची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी या खुल्या रंगमंचाचा फार मोठा वाटा आहे.

येथेच शाळेतील मुला-मुलींना आपल्या अंगातील कलागुणांना वाव देता आला यातून अनेक कलावंत , निवेदक निर्माण झाले आहेत. हा इतिहासाचा साक्षीदार जमिनदोस्त होत असताना माळीनगरवासियांनी हळहळ व्यक्त केली आहे.

या रंगमंचावर अनेक थोर कलाकारांनी कला दाखवली आहे. माळीनगर फेस्टिव्हलसारखा तालुक्यातील प्रसिद्ध असा कार्यक्रम पार पाडला आहे. आता संताच्या पालख्यांनी पावन झालेला हा खुला रंगमंच पाडण्याचे काम सुरू झाले आहे. माळीनगरमधील अबालवृद्ध मंडळी आठवणी डोळ्यात साठवून या वास्तूला शेवटचा निरोप देताना भावूक झाली आहेत.

You Might Also Like

राहुल गांधींना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही – नितीन गडकरी

सोलापूर – काँग्रेस तालुकाध्यक्षावर गुन्हा

सोलापूर – जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर होणार निलंबन

रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सत्यजित पाटणकर भाजपात

सोलापुरात उजनी धरणात ७८.५३ टीएमसी पाणीसाठा

TAGGED: #work #Palkhi #Highway #openstage #Malinagar, #पालखी #महामार्ग #कामात #माळीनगर #खुलेरंगमंच #जमीनदोस्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हेअर ट्रान्सप्लांटच्या नावाखाली 300 जणांची फसवणूक
Next Article एसटी संपाच्या समर्थनार्थ आंदोलन; आडम मास्तरांसह कार्यकर्त्यांना अटक

Latest News

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक
महाराष्ट्र June 12, 2025
एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे
महाराष्ट्र June 12, 2025
एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख
महाराष्ट्र June 12, 2025
विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री
देश - विदेश June 12, 2025
अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी
देश - विदेश June 12, 2025
शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी
महाराष्ट्र June 12, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?