Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रस्तावित पंढरपूर कॅरिडॉरमधून होळकर वाडा वगळा; पुरातत्व विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

प्रस्तावित पंढरपूर कॅरिडॉरमधून होळकर वाडा वगळा; पुरातत्व विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Surajya Digital
Last updated: 2022/12/31 at 1:59 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

पंढरपूर : प्रस्तावित पंढरपूर कॅरिडॉर अंतर्गत चंद्रभागेच्या काठावरील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर वाडा बाधित होणार असून सदर वास्तुचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व लक्षात घेवून त्याचे नुकसान करू नये अशी सूचना पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे संचालक यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. Exclude Holkar Wada from the proposed Pandharpur Corridor; Instructions to Collector of Archeology Department  याबाबत होळकर वाड्याचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपूरकर यांनी माहिती दिली असून कॅरिडॉर विरोधामधील हे एक मोठे यश असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

 

प्रस्तावित पंढरपूर विकास आराखड्याअंतर्गत महाव्दार पोलीस चौकी ते महाव्दार घाट पर्यंत रूंदीकरण सुचविण्यात आले आहे. या रूंदीकरणामध्ये तसेच प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये अडीचशे वर्षापूर्वीच्या होळकर वाड्यातील राम मंदिर, हनुमान मंदिर देखील बाधित होणार आहेत. यास अनेकांनी कडाडून विरोध केला. होळकर वाड्याचे व्यवस्थापक फत्तेपूरकर यांनी देखील आक्षेप घेतला आहे. तसेच केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागास सदर वास्तू विषयक सविस्तर माहिती देत तो बाधित होवू नये यासाठी निवेदन दिले होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

याची पुरातत्त्व विभागाने दखल घेतली असून राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पत्र दिले आहे. यामध्ये पंढरपूर शहर विकास आराखड्यामधील विषय क्रमांक १३ मध्ये होळकर वाड्यातील श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर याचे नुकसान होणार नाही अशी सूचना केली आहे. सदर पत्रामध्ये होळकर वाड्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व असल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान याबाबत होळकर संस्थान इंदोर व येथील विविध पुरातन वास्तू प्रेमींनी होळकर वाड्याविषयी वारंवार प्रयत्न सुरू ठेवले होते. आदित्य फत्तेपूरकर यांनी विविध मंत्री, आमदार, राजकीय पदाधिकारी तसेच अभ्यासकांशी याबाबत संपर्क साधून हा लढा उभारला होता. कॉरिडॉरविरोधी आघाडीसाठी हे एक महत्वाचे यश मानले जात आहे.

बाजीराव विहिरीचे संरक्षण पुणे रस्त्यावरील ऐतिहासिक बाजीराव विहिरदेखील पालखी मार्गाच्या कामांमध्ये बुजविण्यात येणार होती. मात्र याबाबत देखील अशाच पध्दतीने पुरातन विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. सदर विहीरीचे प्राचीन महत्व लक्षात घेवून पुरातत्व विभागाने सदर विहीरीचे नुकसान करू नये, अशी सूचना संबंधित विभागास केली होती. यामुळे रस्ता रूंदीकरणात ही विहीर कायम राहिली आहे. याच पध्दतीने होळकर वाडा बचावाला देखील यश आले आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Exclude #HolkarWada #proposed #Pandharpur #Corridor #Instructions #Collector #Archeology #Department, #प्रस्तावित #पंढरपूर #कॉरिडॉर #होळकरवाडा #वगळा #पुरातत्त्व #विभाग #जिल्हाधिकारी #सूचना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर आज सरत्या वर्षाला निरोप, सोलापुरात चोख बंदोबस्त
Next Article अक्कलकोट । कॉलेजच्या कबड्डी स्पर्धेत काठीने मारहाण; चौदाजणांवर गुन्हा

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?