Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनामुक्त झालेल्या आमदार पडळकरांवर जेसीबीतून फुलांचा वर्षाव; येथेच केले होते वादग्रस्त विधान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

कोरोनामुक्त झालेल्या आमदार पडळकरांवर जेसीबीतून फुलांचा वर्षाव; येथेच केले होते वादग्रस्त विधान

Surajya Digital
Last updated: 2020/09/12 at 9:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर : कोरोनामुक्त झालेले भाजपचे विधान परिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेसीबीतून विविध फुलांचा जेसीबीतून वर्षाव करण्यात आला. पंढरपूरमधील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज (शनिवारी) पंढरपुरात गोपीचंद पडळकरांवर 100 पोती भरुन फुले उधळली.

आमदार गोपीचंद पडळकर कोरोनामुक्त झाल्यानंतर आज शनिवारी हॉस्पिटलमधून बाहेर पडले. त्यानंतर शेकडो समर्थकांनी त्यांच्यावर जेसीबीमधून फुले उधळली. गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती अशा 100 पोती फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी माऊली हळणवर, प्रा. सुभाष मस्के, संजय माने या समर्थकांनी गुलाब, झेंडू, निशिगंधा, शेवंती अशा फुलांचा वर्षाव केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गोपीचंद पडळकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवशीच समोर आला होता. त्यानंतर पडळकर यांनी पंढरपुरात येऊन हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायला सुरुवात केली. पडळकर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. पडळकर यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पंढरपुरातील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला. यावेळी आनंद झालेल्या समर्थकांनी थेट जेसीबीमधून फुलांचा वर्षाव पडळकर यांच्यावर केला.

* याच पंढरपुरात केले होते वादग्रस्त विधान

गोपीचंद पडळकर हे सांगलीचे आहेत. पण सोलापूरच्या दौ-यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. यावर पडळकर यांच्याविरोधात संतापाची लाट उमटली होती. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर जून महिन्यात याच पंढरपुरात म्हटले होते. त्यामुळे राज्यभर पडळकरांविरोधात राष्ट्रवादीने टीका आणि आंदोलन केले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. मात्र भाजपाने यावर सावध पवित्रा घेत ही पक्षाची भूमिका नसल्याचे सांगितले होते.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #गोपीचंदपडळकर #कोरोनामुक्त #जेसीबी #फुलांचा #वर्षाव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहर – जिल्ह्यात उद्या ‘नीट’ची परीक्षा; विद्यार्थ्यांना खास सूचना
Next Article मुख्यमंत्र्यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणा-यास केली कोलकात्यातून अटक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?