Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपुरात जीम प्रशिक्षकाने केली महिला – मुलींची  लैंगिक छळवणूक; जीम प्रशिक्षकाला अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पंढरपुरात जीम प्रशिक्षकाने केली महिला – मुलींची  लैंगिक छळवणूक; जीम प्रशिक्षकाला अटक

Surajya Digital
Last updated: 2022/04/12 at 7:58 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवीन कराड नाकाजवळील एका जीममधील प्रशिक्षकाने जिममध्ये येणाऱ्या अनेक महिला व मुलींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदर प्रशिक्षकास अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 

 

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,  एका कुटुंबातील पती पत्नीने आपली शारीरिक तंदुरुस्ती चांगली रहावी म्हणून पंढरपूर येथील एका नामांकित जीम मध्ये 18 जानेवारी 2022 रोजी पासून जाणे चालू केले होते. त्यांनी जीम मध्ये प्रवेश घेताना त्यांचे मोबाईल नंबर जीममध्ये दिलेले होते.  सुरवातीस  जीम मधील प्रशिक्षक श्रीकांत राजू गायकवाड (रा. पंढरपूर) याने डायटस घेण्याची माहिती देणेसाठी विवाहित स्त्रीस तिचे मोबाईलवर फोन करण्यास सुरवात केली.

त्यानंतर श्रीकांत गायकवाड याने या स्त्रीच्या मोबाईल फोनवर कॉल करुन तसेच व्हॉट्सअप मेसेज करुन तिचेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करु  लागला. त्याचवेळी या स्त्रीने त्यास तुम्हाला ज्या कांही सूचना द्यावयाच्या असतील त्या आम्ही जीममध्ये आल्यावर देत जा, असे सांगितले. तरी देखील श्रीकांत गायकवाड हा वेळी अवेळी मोबाईलवर कॉल करणे, वॉटसअप मेसेज, व्हॉटसअप व्हिडीओ कॉल करणे, इन्टाग्राम चॅटींग, फेसबुक चॅटीग ,स्नॅपचॅट अशा प्रकारे चॅट करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता.

विवाहित स्त्रीचे पती ज्यावेळी कामानिमित्त बाहेर असताना ती एकटी जीममध्ये जात होती. त्यावेळी त्या संधीचा फायदा घेवून श्रीकांत गायकवाड हा या विवाहित स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे तसेच व्यायामाच्या सूचना देण्याचा बहाणा करुन वाईट हेतूने तिचे अंगाला स्पर्श करणे असे प्रकार करत होता. श्रीकांत गायकवाड याच्याकडून या होत असलेल्या कृत्याबाबत या विवाहित स्त्रीने पतीस सांगितले.

Gym instructor commits sexual harassment of women and girls in Pandharpur; Gym instructor arrested

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

यामुळे त्या दोघांनी जिम सोडण्याचा निर्णय घेतला व जीममध्ये जाणे बंद केले. त्यानंतर आरोपी गायकवाडने पिडीत स्त्रीला तीचे  व्हॉट्सअप चॅटींग,फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी वेळोवेळी दिली. परंतू पिडीत स्त्रीने आरोपी  श्रीकांत राजू गायकवाड याचे पासून होत असलेला त्रास तीला असहय झाल्याने पिडीत स्त्रीने आपले पती समवेत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात येवून श्रीकांत राजू गायकवाड (रा.पंढरपूर ) याच्याविरोधात विरोधात तक्रार दिली.

यावरून  पंढरपूर शहर पोलीस ठाणेत गुन्हा रजि क्र 264/2022 भारतीय दंड संहिता कलम 354, 354(अ),354(क),354 (ड), 506 प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आला. आरोपीला  पोलीसांनी अटक केली आहे .सध्या आरोपी पेालीस कोठडीमध्ये आहे.  तपासात या अटक आरोपीने  पंढरपूर शहरातील वेगवेगळ्या जीममध्ये  तसेच सध्या कार्यरत असलेल्या जीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत असताना ब-याच महीला व मुलींची लैंगीक छळवणुक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

महिला व मुलींना गोड बोलून, त्यांची स्तुती करून व त्यांच्याशी मोबाईलद्वारे चॅटींग करून त्यांना  अलगदपणे  त्यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी श्रीकांत राजू गायकवाड (वय 26 वर्षे रा. पंढरपूर) याचेकडून महिला व मुली यांची छळवणूक झाली असल्यास या आरोपी विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे यावे. तक्रारदाराचे नांव पत्ता गोपनीय ठेवणेत येईल, असे पंढरपूर शहर पोलीस ठाणेे तर्फे आवाहन  करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि अरुण पवार, मार्गदर्शनाखाली  निर्भया पथकाचे प्रशांत भागवत, दत्तात्रय आसबे, पोना प्रसाद औटी,  निलेश कांबळे, अरबाज खाटीक, मपोना निता डोकडे, मपोकॉ कुसुम क्षिरसागर, चापोहेकॉ अविनाश रोडगे यांनी केली आहे.

 

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Gym #instructor #commits #sexual #harassment #women #girls in Pandharpur #arrested, #पंढरपूर #जीम #प्रशिक्षक #महिला #मुली #लैंगिक #छळवणूक #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोना काळात पास झालेल्यांची नोकरीसाठी विशेष परीक्षा
Next Article चैत्रीशुध्द वारीसाठी पंढरीत दोन लाख वारकरी दाखल

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?