Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर : पालखी तळांची जागा पडू लागली अपुरी; नवीन जागेचा प्रस्ताव तयार करा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपूर : पालखी तळांची जागा पडू लागली अपुरी; नवीन जागेचा प्रस्ताव तयार करा

Surajya Digital
Last updated: 2022/08/03 at 10:33 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

□ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांची विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाडून पाहणी

 

Contents
□ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांची विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाडून पाहणीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

पंढरपूर :- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत विकासकामांना गती देण्यासाठी पालखी मार्गावरील, पंढरपूर शहरातील सुरु असलेल्या तसेच नव्याने करण्यात येणाऱ्या लोकोपयोगी विकास कामांचा सर्वंकष आराखडा तयार करण्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाकडून पालखी तळांची तसेच पंढरपूर शहरातील विविध ठिकाणची पाहणी करण्यात आली. यावेळेस  सर्व ठिकाणची पाहणी करून सूचना देण्यात आल्या. Pandharpur: The palanquin base is becoming insufficient; Create a new space proposal

 

यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्यअधिकारी (तीर्थक्षेत्र विकास) राजेश तितर, यांनी पालखी मार्गावरील नातेपुते, कारुंडे, वेळापूर, उघडेवाडी, भंडीशेगांव येथील पालखी तळ व विसाव्याची पाहणी केली. तसेच पंढरपूर येथील 65 एकर, चंद्रभागा नदीवरील घाट यांची पाहणी करुन माहिती घेतली.

यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, जगदीश निंबाळकर गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी, पोलीस निरिक्षक अरुण पवार, तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना आवश्यक व दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातर्गत नवीन समाविष्ट कामांना गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. आवश्यक ठिकाणच्या पालखी तळांवरील मुरमीकरण, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युतीकरण आदी कामांचा समावेश करुन पालखी तळ वापरायोग्य करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत.

पालखी महामार्गाच्या रुंदीकरणामुळे भंडीशेगांव येथील सोपानदेव महाराज पालखी तळांची जागा सोहळ्यासाठी अपुरी पडत असल्याने भंडीशेगांव येथील जलसंपदा विभागाच्या जागेचा ताबा घेण्यासाठी आवश्यकती पुर्तता करुन सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच चांगावटेश्वर, चौरंगीनाथ महाराज पालखी वापरा योग्य करण्यासाठी पुर्तता करावी, अशा सूचना तितर यांनी यावेळी दिल्या.

यावेळी तीर्थक्षेत्र विकास अराखड्यातंर्गत शहरात तसेच मंदीर व मंदीर परिसरात करावयाची विकास कामे, पालखी तळ भूसंपादन व पालखी तळांवरील सोयी-सुविधा, वाहन तळ, घाट बांधणी, भीमा नदीपात्रातील नगरपालिका बंधारा वाढविणे, संत नामदेव स्मारकासाठी आवश्यक जागा आदी कामांबाबतची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Pandharpur #palanquin #base #becoming #insufficient #Create #new #space #proposal, #पंढरपूर #पालखी #तळ #जागा #अपुरी #नवीन #प्रस्ताव #तयार #विभागीय #आयुक्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपचा वंश नेमका कोणता? सगळे रेडीमेड हायब्रीड : उद्धव ठाकरे
Next Article शिंदे गट म्हणतंय अपात्रतेसंदर्भात कोर्टाने पडू नये, कोर्ट म्हणतंय कोर्टात पहिला कोण आले

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?