Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बिअर शॉपी फोडणाऱ्या चोराला पंढरपूर तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

बिअर शॉपी फोडणाऱ्या चोराला पंढरपूर तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Surajya Digital
Last updated: 2022/07/15 at 6:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ अनोळखी इसमाचा खून केलेला मृतदेह सापडला, सांगोला परिसरातील घटना

पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील बिअर शॉपी फोडल्या प्रकरणी एकास अटक करून त्याकडून 56 हजार रुपयांच्या बिअर बॉक्स आणि कर्नाटक राज्यातील चोरीला गेलेली महिंद्रा बोलेरो गाडी पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच  बियर बॉक्स चोरीला गेल्याची घटना घडली होती. Pandharpur taluka police handcuffed a thief who broke into a beer shop, sangola deadbody 

 

फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील महेश बिअर शॉपी फाडून 66 हजार रुपयांच्या 25 बिअरचे बॉक्स चोरीला गेल्याची घटना 10 जुलै 2022 रोजी घडली होती. फिर्यादी उमाकांत काळे यांच्या फिर्यादीनुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

पंढरपूर तालुका पोलीस आणि स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाला या गुन्ह्यातील आरोपी महमद मधुकर पवार (रा. ढोक बाभुळगाव ता. मोहोळ) हा मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे आल्याची माहिती मिळताच त्यांना ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 56 हजार रुपयांचे 20 बिअरचे बॉक्स आणि कर्नाटक राज्यतून चोरीला गेलेली महिंद्रा बोलेरो गाडी ताब्यात घेतली. त्या आरोपीला 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याचे तपास अधिकारी पोलीस हवालदार नितीन चवरे यांनी दिली. या गुन्ह्यातील इतर तीन आरोपींचा तपास पोलीस करत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ अनोळखी इसमाचा खून केलेला मृतदेह सापडला, सांगोला परिसरातील घटना

सोलापूर – एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुनापवाडी (ता. सांगोला) येथील फॉरेस्ट मध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

गुनापवाडी येथील फॉरेस्टमध्ये असलेल्या नालाबंडिंगच्या चारीमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळाल्यानंतर सांगोल्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मयताच्या अंगावर तीष्ण शस्त्राच्या गंभीर जखमा आढळल्या.

 

अनोळखी मारेकऱ्यांनी त्याचा तीक्ष्ण शस्त्राने खून केला. आणि पुरावा नष्ट काण्यासाठी मृतदेह हिरवा रंगाच्या गुंडाळून प्लास्टिकच्या पोत्यामध्ये बांधून टाकून दिल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह रंगाने काळा सावळा असून त्याच्या चेहऱ्यावर बारीक दाढी आहे. तसेच त्याच्या अंगावर फक्त निळ्या रंगाची जीन्सची पॅन्ट आहे. मृतदेहासंबधी कोणास माहिती असल्यास त्यांनी सांगोला पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक निरीक्षक हुले यांनी केले आहे.

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Pandharpur #talukapolice #handcuffed #thief #broke #beershop #sangoa #deadboday, #बिअरशॉपी #फोडणाऱ्या #चोर #पंढरपूर #तालुका #पोलिस #ठोकल्या #बेड्या #सांगोला #मृतदेह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट, केले औक्षण करून स्वागत
Next Article मोहोळजवळ दुचाकी – ट्रकचा अपघात; एक ठार तर एक जखमी

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?